उल्हासनगरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, धारदार शस्त्र जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 18:27 IST2018-01-31T18:27:02+5:302018-01-31T18:27:12+5:30

जुन्या भांडणाचा रागातून तिवारी यांच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Confiscated gang rams, sharp weapons in Ulhasanagar | उल्हासनगरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, धारदार शस्त्र जप्त

उल्हासनगरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, धारदार शस्त्र जप्त

उल्हासनगर : जुन्या भांडणाचा रागातून तिवारी यांच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-2, खेमानी परिसरात दिनेश व राकेश तिवारी राहतात. त्यांचे सुराज निशाद यांच्यासह मित्रा सोबत भांडण झाले होते. जुन्या भांडणाचा रागातून सुरज निशाद, गोकुळ झा, निलेश यादव, विशाल यादव, चिंटू राय, मुन्ना राय व अरबाज यांनी संगनमत करून दोघाच्या घरावर दरोडा टाकण्याचे निश्चित केले. मंगळवारी सकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान दरोडा टाकणाऱ्या टोळीची माहिती खबऱ्याद्वारे पोलिसांना मिळाली.
गुप्त खबऱ्याच्या माहिती नुसार पोलिस अधिकारी संजय गायकवाड यांच्या पथकाने, खेमानी परिदारात सापळा रचला. मंगळवारी सकाळी 5 वाजता आलेल्या संशयीत इसमांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे तलवार, चाकू, लोखंडी रॉड, कोयता, रस्सी आदी साहित्य मिळाले. त्यांची अधिक चौकसी केली असता, तिवारी यांच्यावरील जुन्या भांडणाच्या रागातून, घरावर दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व सातही दरोडेखोरांना अटक करून, उल्हासनगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला. अधिक चौकसी उल्हासनगर पोलीस करीत आहे.

Web Title: Confiscated gang rams, sharp weapons in Ulhasanagar

टॅग्स :Arrestअटक