मनपाच्या फसवणूकी प्रकरणी करमुल्यांकन, अधिका-यासह लिपीकावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 07:41 PM2017-10-26T19:41:35+5:302017-10-26T19:42:11+5:30

स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने महानगरपालिका प्रशासनाची आणि शासनाची फसवणूक करणा-या माजी करमुल्यांकन अधिका-यासह लिपीकावर निजामपूर पोलीस ठाण्यात आज सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.

Complainant in the case of Manpa's falsely accusation, filed a complaint with the author on the script | मनपाच्या फसवणूकी प्रकरणी करमुल्यांकन, अधिका-यासह लिपीकावर गुन्हा दाखल 

मनपाच्या फसवणूकी प्रकरणी करमुल्यांकन, अधिका-यासह लिपीकावर गुन्हा दाखल 

Next

भिवंडी : स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने महानगरपालिका प्रशासनाची आणि शासनाची फसवणूक करणा-या माजी करमुल्यांकन अधिका-यासह लिपीकावर निजामपूर पोलीस ठाण्यात आज सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.
 महानगरपालिका क्षेत्रातील घर क्र.१०७ चे मालमत्ताधारक शब्बीर सिकंदर बोबडे,घर क्र.३२९च्या मालमत्ताधारक सईदा मोहम्मद रफीक व १७६/१चे मालमत्ताधारक मयुर गणेश म्हात्रे यांना आर्थिक फायदा पोहोचविण्याच्या हेतूने त्यांचे कर आकारणीसाठी आलेले अर्ज  करमुल्यांकन अधिकारी रमेश थोरात व लिपीक फारूख खर्बे यांनी खोटा आवक क्रमांक देऊन स्विकारले.तसेच त्यांच्या मालमत्ता कराचा बनावट प्रस्ताव तयार करून कर आकारणीची नोटीस/आदेश बजावला.हा आदेश देताना त्यावर देखील कार्यालयीन बनावट जावक क्रमांक नमुद करून महानगरपालिकेची व शासनाची फसवणूक केली.ही आकारणी बनावट असल्याप्रकरणी प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर सखोल चौकशी करून करमुल्यांकन अधिकारी वंदना गुळवे यांच्या आदेशाने दिलीप खाने यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात रमेश थोरात व फारूख खर्बे यांच्या विरोधात तक्रार केली आहे.याच प्रकरणी माजी करमुल्यांकन अधिकारी रमेश थोरात हा निलंबीत असुन त्यांच्यासह लिपीकावर आज गुन्हा दाखल झाल्याने पालिकेच्या कर्मचाºयांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.पोलीसांनी आद्याप कोणासही अटक केलेली नाही.

Web Title: Complainant in the case of Manpa's falsely accusation, filed a complaint with the author on the script

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.