अजब! पालिकेच्याच लेखी आदेशाने एसटीच्या इमारतीत सुरु होणार बार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 04:59 PM2017-10-24T16:59:38+5:302017-10-24T17:00:14+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील गुरु नामक बार १४ आॅक्टोबरला न्यायालयीन स्थगिती असतानाही तडजोडीने जमिनदोस्त केला.

Awesome! By the written order of the corporation, the bar will start at the ST building | अजब! पालिकेच्याच लेखी आदेशाने एसटीच्या इमारतीत सुरु होणार बार

अजब! पालिकेच्याच लेखी आदेशाने एसटीच्या इमारतीत सुरु होणार बार

Next

- राजू काळे 
भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील गुरु नामक बार १४ आॅक्टोबरला न्यायालयीन स्थगिती असतानाही तडजोडीने जमिनदोस्त केला. तडजोडीत तोडलेल्या बारचा संसार समोरील राज्य परिवहन महामंडळ (एसटी) इमारतीच्या गच्चीवर हलविण्यात आल्याचे वृत्त लोकमतने सर्वप्रथम प्रसिद्ध केले. स्थलांतरीत बारच्या संसाराला त्या इमारतीत छप्पर मिळवुन देण्याचा अजब प्रकार पालिकेच्याच लेखी आदेशाने झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पालिकेने एसटी महामंडळाला मिठागरालगतची जागा प्रदिर्घ मुदतीवर भाडेपट्याने दिली आहे. सध्या एसटीचा कारभार येथील एकमजली इमारतीत सुरु आहे. या इमारतीच्या गच्चीवर काही महिन्यांपुर्वीच पालिकेने पावसाळी गळतीच्या नावाखाली छप्पर बांधले. याच इमारतीलगत पालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाची चौकी देखील बांधण्यात आली. त्यासमोर न्यायालयीन स्थगिती आदेश असलेला एकमजली गुरु नामक बार असल्याने तेथील रस्ता अरुंद झाला होता. तेथुनच बेस्ट, एसटी व मीरा-भार्इंदर महापालिका परिवहन सेवेच्या बस सोडल्या जात असुन रिक्षा स्टॅन्डही येथेच असल्याने हे ठिकाण प्रवाशांचे मोठ्याप्रमाणातील वर्दळीचे ठिकाण आहे. अशातच तेथील अरुंद रस्त्यामुळे तेथे वाहतुक कोंडी नित्याची झाली असताना पालिकेने पुर्व-पश्चिमेला जोडणारा भुयारी वाहतुक मार्ग त्याच रस्त्यालगत बांधला आहे. तो मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २० आॅक्टोबरला खुला करण्यात आला. तत्पुर्वी पालिकेने १३ आॅक्टोबरपासुन तेथील अरुंद रस्त्याची रुंदीकरण मोहिम राबविण्यास सुरुवात केली. त्यात तेथील गुरु नामक बार तोडक कारवाईत अडचणीचा ठरत होता. कारण त्यावर न्यायालयीन स्थगिती अद्यापही आहे. त्यामुळे हा बार हटविणे पालिकेची तांत्रिक अडचण ठरली असताना ती तडजोडीत सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला बार मालकाला पर्यायी जागेच्या मागणीचे पत्र देण्याची सुचना करण्यात आली. बार मालकीण शारदा गणपत शेट्टीगर यांनी १३ आॅक्टोबरलाच पालिकेला पत्रव्यवहार करीत रस्ता रुंदीकरणात बाधित ठरणाय््राा बारला पर्यायी जागा देण्याची रितसर पालिकेकडे मागणी केली. त्या पत्राची पालिकेने त्वरीत दखल घेत त्याच दिवशी बार मालकाला बारचा संसार समोरील एसटी इमारतीच्या गच्चीवर हलविण्याचा लेखी आदेश दिल्याचा धक्कादायक प्रकार केला. बारचा संसार एसटीच्या इमारतीत ...या मथळ्याखालील वृत्त लोकमतने सर्वप्रथम प्रसिद्ध केले. यानंतरही प्रशासनाने तडजोडीला जागुन सुरु करण्यात येणाय््राा बारसाठी एसटीच्या इमारतीलगत तळमजल्यासह गच्चीवर पर्यायी जागा देण्यात येत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार बार मालकाने नुकतेच इमारतीच्या तळमजल्यालगत बांधकामाला सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी मद्य तसेच तंबाखू, गुटखा विक्री व सेवनाला बंदी असताना चक्क एसटीच्या इमारतीत बार सुरु होण्याची राज्यातील हि पहिलीच घटना असावी, अशी चर्चा प्रवाशांत सुरु झाली आहे. फडणवीस सरकारात हेच का अच्छे दिन, अशी संतप्त प्रतिक्रीया देखील प्रवाशांकडुन व्यक्त केली जात आहे.

Web Title: Awesome! By the written order of the corporation, the bar will start at the ST building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.