ठाण्यातून हद्दपार केलेला गुंड आशीष गुप्ताला पोलिसांनी केलं पुन्हा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:28 IST2017-09-07T02:28:28+5:302017-09-07T02:28:42+5:30

ठाणे रेल्वे पोलिसांनी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून हद्दपार केलेला आशीष बाकेलाल गुप्ता (२०) या आरोपीला कोपरी पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले.

 Ashish Gupta, who was abducted by Thane, was again arrested by the police | ठाण्यातून हद्दपार केलेला गुंड आशीष गुप्ताला पोलिसांनी केलं पुन्हा जेरबंद

ठाण्यातून हद्दपार केलेला गुंड आशीष गुप्ताला पोलिसांनी केलं पुन्हा जेरबंद

ठाणे : ठाणे रेल्वे पोलिसांनी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून हद्दपार केलेला आशीष बाकेलाल गुप्ता (२०) या आरोपीला कोपरी पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले. ठाणे जिल्ह्यात येण्याची त्याला मनाई असताना कोपरीतील सिद्धार्थनगर भागात तो फिरताना दिसला.
त्याच्याविरुद्ध ठाणे, कल्याण या रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, मोबाइलचोरी आणि प्रवाशांच्या जीवाला धोका पोहोचवणे, अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. कोपरी पोलिसांतही खुनाच्या प्रयत्नासह हाणामारी आणि चोरीच्या गुन्ह्यांची नोंद त्याच्याविरुद्ध आहे. मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय पोलीस उपायुक्त समाधान पवार यांनी २४ जुलै २०१७ रोजी मुंबईसह चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. मात्र, या आदेशाला धाब्यावर बसवून तो कोपरी परिसरात बिनधास्तपणे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कोर्डे, निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या पथकातील उपनिरीक्षक अशोक सावंत, जमादार राजा पाटील, हवालदार दत्ता पालांडे आणि तुकाराम डुंबरे यांनी ५ सप्टेंबरला रात्री कोपरीतील महापालिका रुग्णालयासमोरून अटक केली. त्याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती कोर्डे यांनी दिली.

Web Title:  Ashish Gupta, who was abducted by Thane, was again arrested by the police

टॅग्स :Crimeगुन्हा