अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आता कोकणासह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:01 IST2018-12-09T01:00:13+5:302018-12-09T01:01:39+5:30

विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे

Adjustment of additional teachers in any district of the state with Konkan now | अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आता कोकणासह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आता कोकणासह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात

ठाणे : विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील १५६ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली काढत असताना केवळ ७७ शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातील खाजगी शाळांमध्ये झाले. परंतु, उर्वरित ७९ शिक्षकांना विभागीय कार्यालयाकडे सुपूर्द केले आहेत. त्यांचे समायोजन आता कोकणातील जिल्ह्यांत अन्यथा राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागी केले जाणार आहे.

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तीन दिवसांपूर्वी कोपरी येथील मंगला हायस्कूलमध्ये कॅम्प घेण्यात आला. यामध्ये १५ शिक्षकांचे पाचवी ते सहावीच्य विद्यार्थ्यांसाठी समायोजन झाले. तर सातवी ते आठवीच्या वर्गासाठी ३१ शिक्षक आणि नववी ते दहावीच्या वर्गासाठी ३१ शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन झाले. या सुमारे ७७ शिक्षकांचे जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. यानंतर उरलेल्या ७९ शिक्षकांची रवानगी आता कोकण विभागीय आयुक्तालयाकडे केली आहे. त्यांचे समायोजन ठाणे जिल्ह्याव्यतिरिक्त कोकण विभागीतील अन्य जिल्ह्यात होईल, संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले.

Web Title: Adjustment of additional teachers in any district of the state with Konkan now