अंबरनाथमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळून 6 विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 11:06 PM2018-06-14T23:06:52+5:302018-06-14T23:06:52+5:30

अंबरनाथ नगरपालिकेसमोरील जॉय हब या इमारतीची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. या लिफ्टमध्ये क्लास मधील 6 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

6 students injured in building collapse in Ambernath | अंबरनाथमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळून 6 विद्यार्थी जखमी

अंबरनाथमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळून 6 विद्यार्थी जखमी

googlenewsNext

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेसमोरील जॉय हब या इमारतीची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. या लिफ्टमध्ये क्लास मधील 6 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी 3 वाजता घडली. अंबरनाथ स्टेशन रोडवरील या इमारतीच्या लिफ्टचे काम हे नियमित केले जात नसल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. याच इमारतीत 20 दिवसांपूर्वी देखील लिफ्ट कोसळण्याची घटना घडली होती. अवघ्या 20 दिवसांत दोन वेळा लिफ्ट कोसळण्याची घटना घडल्याने इमारतीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

संपूर्ण व्यावसायिक गाळे असलेल्या या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार घडला आहे. गुरुवारी झालेल्या अपघातात विद्यार्थी किरकोळ जखमी झालेले असले तरी ते भेदरलेल्या अवस्थेत आहेत. अंबरनाथ पालिकेचा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

Web Title: 6 students injured in building collapse in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.