गंगनम स्टाईल! सात्विक अन् चिरागने कोरिया ओपन जिंकली आणि त्यांचाच डान्स करू लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 04:37 PM2023-07-23T16:37:10+5:302023-07-23T16:39:04+5:30

सात्विक आणि चिराग यांनी यावर्षी इंडोनेशिया सुपर 1000 आणि स्विस ओपन सुपर 500 विजेतेपदही जिंकले आहे.

Korea Open 2023: Gangnam Style dance by Satwik and Chirag won the Korea Open and started their own dance | गंगनम स्टाईल! सात्विक अन् चिरागने कोरिया ओपन जिंकली आणि त्यांचाच डान्स करू लागले

गंगनम स्टाईल! सात्विक अन् चिरागने कोरिया ओपन जिंकली आणि त्यांचाच डान्स करू लागले

googlenewsNext

येओसु (कोरिया): भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीने या वर्षीची तिसरी स्पर्धा जिंकली आहे. कोरिया ओपन मेन्स डबल स्पर्धा जिंकली आहे. इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केल्यानंतर या दोघांनी ओप्प गंगनम स्टाईल या कोरियान गाण्यावर मैदानातच ठेका धरला. 

रविवारी झालेल्या फायनलमध्ये इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित फजर अल्फियान आणि मोहम्मद रियान अर्दियांटो यांचा १७-२१, २१-१३, २१-१४ असा पराभव केला. भारतीय जोडी एका गेमने पिछाडीवर पडली होती पण त्यांनी शानदार पुनरागमन करून विजेचे पद पटकावले आहे. 

सात्विक आणि चिराग यांनी यावर्षी इंडोनेशिया सुपर 1000 आणि स्विस ओपन सुपर 500 विजेतेपदही जिंकले आहे. 2012 मध्ये रिलीज झालेल्या गाण्यांमध्ये PSY ने 'गंगनम स्टाइल' च्या सिग्नेचर स्टेपवर त्यांनी डान्स केला. या जोडीने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक, थॉमस चषक सुवर्णपदक, जागतिक चॅम्पियनशिपमधील कांस्य पदक तसेच सुपर ३०० (सय्यद मोदी आणि स्विस ओपन), सुपर ५०० (थायलंड आणि इंडिया ओपन), सुपर ७५० (फ्रेंच ओपन) आणि इंडोनेशिया ओपन सुपर१०० यासह अनेक विजेतेपदे एकत्र जिंकली आहेत.

Web Title: Korea Open 2023: Gangnam Style dance by Satwik and Chirag won the Korea Open and started their own dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton