YouTube वर फक्त १५ सेकंदाच्या Video तून करा जबरदस्त कमाई, आजच भरा 'हा' फॉर्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 06:05 PM2023-01-10T18:05:07+5:302023-01-10T18:06:21+5:30

व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube कमाईचा एक नवीन पर्याय तुमच्यासाठी घेऊन आला आहे. आतापर्यंत लोक Youtube व्हिडिओंमधून कमाई करत आहेत.

Youtube Will Start Paying For Shorts Video Fill This Form Before 10 July 2023 | YouTube वर फक्त १५ सेकंदाच्या Video तून करा जबरदस्त कमाई, आजच भरा 'हा' फॉर्म!

YouTube वर फक्त १५ सेकंदाच्या Video तून करा जबरदस्त कमाई, आजच भरा 'हा' फॉर्म!

googlenewsNext

नवी दिल्ली-

व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube कमाईचा एक नवीन पर्याय तुमच्यासाठी घेऊन आला आहे. आतापर्यंत लोक Youtube व्हिडिओंमधून कमाई करत आहेत. पण आता यूट्यूब व्हिडिओची जागा 'यूट्यूब शॉर्ट्स' घेत आहे. 'यूट्यूब शॉर्ट्स' व्हिडिओद्वारे १५ सेकंदांचे व्हिडिओ बनवले जातात. मात्र, या १५ सेकंदाच्या व्हिडिओंमधून कोणतीही कमाई करता येत नव्हती. पण आता यूट्यूब १५ सेकंदाच्या व्हिडिओतूनही कमाई करण्याची संधी देत ​​आहे.

YouTube Short मधून कशी कमाई कराल? फॉर्म्युला जाणून घ्या
YouTube ने दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट्स व्हिडिओसाठीही मॉनिटायजेशन सुरू करण्यात आलं आहे. त्यातून कमाई करण्याची प्रक्रिया अगदी YouTube व्हिडिओ सारखीच असेल. कमाईचा फॉर्म्युला तीन गोष्टींवर अवलंबून आहे. सर्वप्रथम, तुमचे सबस्क्रायबर्स अधिक असावेत. त्यानुसार तुमच्या व्हिडिओला जाहिरात दिली जाईल. दुसरा, तुमचा शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाइम किती आहे ते पाहिलं जाईल आणि तिसरं म्हणजे तुम्ही एखाद्या ब्रँडचा प्रचार करून कमाई करू शकाल.

YouTube Shorts वरून कसे कमवाल?
YouTube Shorts ची कमाई प्रक्रिया १ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होत आहे. यानंतर युझर्सना शॉर्ट अॅड रेवेन्यू टर्म आणि कंडिशन फॉर्म भरावा लागेल. यासाठी, सर्व पार्टनर्सना नवीन YouTube पार्टनर प्रोग्राम अंतर्गत अटी स्वीकाराव्या लागतील.

तुम्ही फॉर्म न भरल्यास YouTube शॉर्ट्समधून कमाई करू शकणार नाही. हा फॉर्म भरण्यासाठी मुदत देखील दिली गेली आहे. १० जुलै २०२३ पर्यंत फॉर्म न भरल्यास तुमचे Youtube चॅनेल मॉनिटायझेशन करारातून काढून टाकले जाईल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही YouTube शॉर्ट्स व्हिडिओचे कंटेंट क्रिएटर असाल, तर तुम्ही ताबडतोब YouTube चा टर्म आणि कंडिशन फॉर्म भरा.

YouTube शॉर्ट मॉनिटायझेशन प्रोग्राम मार्च २०२३ पासून लागू केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजे जर तुम्ही जर अटी व शर्ती मान्य केल्या तर मार्च २०२३ पासून कमाईची संधी मिळेल.

Web Title: Youtube Will Start Paying For Shorts Video Fill This Form Before 10 July 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.