व्हॉट्सअॅप, फेसबुक होणार बंद? ब्लॅकबेरीनं केला चोरीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 11:18 PM2018-03-08T23:18:44+5:302018-03-08T23:31:12+5:30

जगभरात वापरण्यात येणारं व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारखे मेसेंजर अॅप...

Whatsapp, will Facebook stop? Blackberry accused of stealing carry | व्हॉट्सअॅप, फेसबुक होणार बंद? ब्लॅकबेरीनं केला चोरीचा आरोप

व्हॉट्सअॅप, फेसबुक होणार बंद? ब्लॅकबेरीनं केला चोरीचा आरोप

Next

नवी दिल्ली - लोकप्रिय मेसेंजिंग अॅप व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर ब्लॅकबेरीनं टेक्नोलॉजी चोरल्याचा आरोप केला आहे. त्यामुळं जगभरात वापरण्यात येणारं व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे मेसेंजर अॅप धोक्यात आहे. इंटरनेटचा विस्तार झाल्यापासून फेसबूक आणि व्हॉट्स अॅपचा वापर बेसुमार वाढला आहे. 

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ब्लॅकबेरीने फेसबुकवर मॅसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसाठी आपली टेक्नोलॉजी चोरल्याचा आरोप केला आहे. सध्या या अॅपवर सुरु असेलेले फिचर आमची पेटेंट टेक्नोलॉजी असल्याचा दावा ब्लॅकबेरीने केला आहे. ब्लॅकबेरीने केलेल्या दाव्यानुसार, फेसबुक इंस्टन्ट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये ब्लॅकबेरीच्या टेक्निकचा प्रयोग करत आहे. त्यामुळं ब्लॅकबेरीने लॉस इंजेलिसमधील न्यायालयात फेसबुकवर टेक्नोलॉजी चोरी केल्याचा खटला दाखल केला आहे. 

15 वर्षापूर्वी मॅसेंजर युजर्समध्ये ब्लॅकबेरी लोकांच्या पहिल्या पसंतीचे होतं. सद्या आपल्या युजर्ससाठी नवनवे प्रयोग करणाऱ्या फेसबुक, व्हॉट्सअॅपवर ब्लॅकबेरीनं चोरीचा आरोप केला आहे. त्यामुळं आता यांच्याच कायदेशिर लढाई सुरु झाली आहे. आपल्या दाव्यामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे आम्ही डेव्हलप करण्यात आलेल्या टेक्निकचा वापर करत आहे असा ब्लॅकबेरीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

 फेसबुकने आमच्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीची चोरी केली आहे. त्यामुळे फेसबुक मॅसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामला बंद करण्यात यावे. फेसबुकने अनेक फिचर्स केले चोरी आहेत असा दावा ब्लॅकबेरी कडून करण्यात आला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ब्लॅकबेरी कंपनीला आर्थिक नुकसान भरपाई हवी आहे.

या सर्व प्रकरणावर फेसबुककडून स्पष्टिकरण देण्यात आले आहे. फेसबुकचे डेप्युटी जनरल काऊंसिल पॉल ग्रेवान यांनी स्पष्टिकरण दिलं आहे. ब्लॅकबेरीने नवं काही तंत्रज्ञान शोधण्याऐवजी दुसऱ्यांच्या संशोधनावर टॅक्स लावण्याचा विचार करत आहे. या प्रकरणी आम्ही ब्लॅकबेरीचा कायदेशीर सामना करु.

यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये ब्लॅकबेरीने नोकियावर 3जी आणि 4जी वायरलेस कम्युनिकेशन टेक्निकच्या पेटंट संदर्भात खटला दाखल केला होता.  

Web Title: Whatsapp, will Facebook stop? Blackberry accused of stealing carry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.