WhatsAppने आणलं नवीन फीचर! आता फोटोचेही बनवा 'स्टिकर्स', Edit सुद्धा करता येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 06:30 PM2024-03-06T18:30:36+5:302024-03-06T18:36:10+5:30

यासाठी तुम्हाला WhatsApp चे Version 2.24.6.5 इन्स्टॉल करावे लागेल

WhatsApp introduced a new feature, now you can make stickers of photos! | WhatsAppने आणलं नवीन फीचर! आता फोटोचेही बनवा 'स्टिकर्स', Edit सुद्धा करता येणार!

WhatsAppने आणलं नवीन फीचर! आता फोटोचेही बनवा 'स्टिकर्स', Edit सुद्धा करता येणार!

WhatsApp हे एक असे अँप आहे जे सतत तुम्हाला काही ना काही नवीन फिचर देत असता. काही दिवसांपूर्वी आलेल्या अपडेटनुसार, तुम्ही व्हॉट्सॲपमध्येही तारखेनुसार मेसेज सर्च करू शकता. याशिवाय, एका नवीन रिपोर्टनुसार, ताज्या अपडेटमध्ये लवकरच स्टिकर एडिटर हे फीचर येणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, Meta च्या या ॲपमधील स्टिकर एडिटर फीचर सध्या अँड्रॉईड बीटा टेस्टर्ससाठी रिलीज करण्यात आले आहे. हे फिचर वापरण्यासाठी, तुम्हाला WhatsApp चे नवीन अपडेट (Version 2.24.6.5) इन्स्टॉल करावे लागेल.

नव्या फिचरमध्ये फोटोचे स्टिकर बनवता येणार!

WhatsApp एक नवीन टूल आणत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणताही फोटो स्टिकरमध्ये बदलू शकता. हे करणे अगदी सोपे आहे. तुम्हाला फक्त स्टिकर कीबोर्डवर जावे लागेल आणि तेथे "create" पर्याय निवडावा लागेल. किंवा तुम्ही तो फोटो थेट उघडू शकता, वर असलेल्या तीन डॉट्सवरील मेनूवर जा आणि तेथून "create sticker" सिलेक्ट करा.

स्टिकर्स Edit करण्याचीही असणार सुविधा

तुम्ही आधीपासून अस्तित्वात असलेले स्टिकर्स Edit करण्यास देखील सक्षम असाल. कोणतेही स्टिकर निवडल्यावर, WhatsApp आपोआप ड्रॉईंग एडिटर उघडेल, जे त्या फोटोचा मुख्य भाग फोकसमध्ये आणेल. त्यानंतर एडिट करून तुम्हाला तो स्टिकर बनवून दाखवला जाईल. तुम्हाला स्टिकर आवडत नसल्यास, तुम्ही स्क्रीनच्या तळाशी दिलेल्या पर्यायांमधून दुसरा स्टिकर निवडू शकता.

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, युजर्सना नवीन फिचरचा फायदा होईल. ते आता त्यांच्या फोटोंमधून स्वतःचे स्टिकर्स तयार करू शकतील. याद्वारे, ते त्यांच्या आवडीनुसार स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतील असे टीमकडून सांगितले जात आहे. तसेच, त्यांना इतर कोणतेही ॲप डाउनलोड करण्याची किंवा बाहेरून स्टिकर्स शोधण्याची आवश्यकता नाही.

Web Title: WhatsApp introduced a new feature, now you can make stickers of photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.