सॅमसंगचा ड्युअल डिस्प्लेयुक्त फ्लिप फोन

By शेखर पाटील | Published: December 4, 2017 03:19 PM2017-12-04T15:19:50+5:302017-12-04T15:20:28+5:30

सॅमसंगने डब्ल्यू२०१८ हा फ्लिप फोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात ड्युअल डिस्प्लेसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

Samsung's dual display flip phone | सॅमसंगचा ड्युअल डिस्प्लेयुक्त फ्लिप फोन

सॅमसंगचा ड्युअल डिस्प्लेयुक्त फ्लिप फोन

Next

स्मार्टफोनचे आगमन होण्याआधी फ्लिपफोन बर्‍यापैकी लोकप्रिय होते. मात्र टचस्क्रीन तंत्रज्ञानाचे आगमन झाल्यानंतर फ्लिपफोनची लोकप्रियता ओहोटीला लागली. अवघे जग टचस्क्रीनयुक्त स्मार्टफोनच्या प्रेमात पडल्यानंतर ते हे फोन इतिहासजमा झाले. बहुतांश कंपन्यांनी फ्लिपफोनचे उत्पादन थांबविले. मात्र अलीकडे एलजी आणि सॅमसंग या दोन आघाडीच्या कंपन्यांनी फ्लिपफोन सादर केले आहेत. यापैकी सॅमसंगने डब्ल्यू२०१८ हा फ्लिप फोन अलीकडेच प्रदर्शीत केला होता आता यालाच आता बाजारपेठेत उतारण्यात आले आहे.

सॅमसंग डब्ल्यू२०१८ या मॉडेलमध्ये ४.२ इंच आकारमानाचा आणि १०८० बाय १९२० पिक्सल्स अर्थात फुल एचडी क्षमता असणारे दोन सुपर अमोलेड डिस्प्ले प्रदान करण्यात आले आहेत. यापैकी एक मुख्य जागी तर दुसरा बाहेरील बाजूस असेल. या दोन्ही डिस्प्लेंवर कॉर्नींग गोरीला ग्लास ५चे संरक्षक आवरण असेल. या स्मार्टफोनला ग्लास आणि मेटलयुक्त बॉडी देण्यात आलेली आहे. यात क्वाड कोअर स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. यातील एक्सट्रीम एडिशनमध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. तर कलेक्टर एडिशनमध्ये ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज असेल. या दोन्ही आवृत्त्या एलिगंट गोल्ड आणि प्लॅटीनम या दोन रंगांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

सॅमसंग डब्ल्यू२०१८ स्मार्टफोनमध्ये एफ/१.५ अपार्चर आणि ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशनसह यात १२ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा असेल. यात बोके इफेक्ट देण्याची सुविधा आहे. तर  सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यातील २३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती युएसबी टाईप-सी केबलच्या माध्यमातून चार्ज करता येणार आहे. हात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगने विकसित केलेला बिक्सबी हा ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडवर चालणारा व्हर्च्युअल असिस्टंटही असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट आवृत्तीवर चालणारा आहे.

सॅमसंग डब्ल्यू२०१८ या स्मार्टफोनमध्ये फोर-जी नेटवर्क सपोर्टसह यात ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, मायक्रो-युएसबी, जीपीएस, एनएफसी आदी पर्याय देण्यात आले आहेत. सॅमसंग कंपनीचे हे मॉडेल पहिल्यांदा चीनमधील ग्राहकांना मिळणार आहे. 
 

Web Title: Samsung's dual display flip phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.