OPPO करणार धमाका! सर्वात वेगवान प्रोसेसरसह येतायत दोन स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 07:28 PM2021-12-20T19:28:48+5:302021-12-20T19:31:03+5:30

OPPO Find X4 series: Oppo MediaTek च्या लेटेस्ट Dimensity 9000 आणि Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह दोन स्मार्टफोन सादर करू शकते.

Oppo find x4 series smartphones will be launched in february or march  | OPPO करणार धमाका! सर्वात वेगवान प्रोसेसरसह येतायत दोन स्मार्टफोन

OPPO करणार धमाका! सर्वात वेगवान प्रोसेसरसह येतायत दोन स्मार्टफोन

Next

Oppo लवकरच आपली फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज सादर करणार आहे. ही सीरिज OPPO Find X4 नावानं ग्राहकांच्या भेटीला येईल. आता या सीरिजमधील दोन फोन्सची माहिती मिळाली आहे. कंपनी Find X4 आणि Find X4 Pro हे दोन फोन्स सादर करेल. हे फोन्स फ्लॅगशिप प्रोसेसरसह बाजारात येतील. तसेच यात फास्ट चार्जिंग फिचर देखील मिळेल.  

OPPO Find X4 series च्या लाँचच्या आधीच टिपस्टर Digital Chat Station नं सीरिजमधील फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. त्यानुसार, कंपनी MediaTek च्या लेटेस्ट Dimensity 9000 आणि Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह दोन स्मार्टफोन सादर करू शकते. यातील वॅनिला Find X4 स्मार्टफोन मीडियाटेक आणि तर प्रो मॉडेल क्वालकॉम चिपसेटसह बाजारात येऊ शकतो.  हे डिवाइस फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ग्राहकांच्या भेटीला येतील.

OPPO Find X4 series 

OPPO Find X4 series मधील या दोन्ही स्मार्टफोनमध्ये पेरिस्कोप टेक्नॉलॉजी असलेला टेलीफोटो कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तसेच यात 80W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. सीरिजमधील अल्ट्रा किंवा प्रो प्लस मॉडेल 100W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो, कारण मीडिया रिपोर्ट्समध्ये ओप्पोच्या अशा फोनचा उल्लेख आला आहे. वनप्लस आणि रियलमी देखील वेगवान चार्जिंग असलेले फोन्स बाजारात उतरवणार आहे.  

हे देखील वाचा: 

बजेट कमी आहे? मग 15 हजारांच्या आत येणारे हे धमाकेदार फोन्स एकदा बघाच

सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास

Web Title: Oppo find x4 series smartphones will be launched in february or march 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.