गुगल असिस्टंटच्या मदतीने करा ड्युओ अ‍ॅपवर व्हिडीओ कॉल!

By शेखर पाटील | Published: July 27, 2018 04:29 PM2018-07-27T16:29:20+5:302018-07-27T16:30:28+5:30

Google Duo गुगल असिस्टंटच्या मदतीने आता गुगलच्याच ड्युओ या अ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करणे आता शक्य झाले असून नवीन अपडेटमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे.

Now ask Google Assistant to make Duo Calls | गुगल असिस्टंटच्या मदतीने करा ड्युओ अ‍ॅपवर व्हिडीओ कॉल!

गुगल असिस्टंटच्या मदतीने करा ड्युओ अ‍ॅपवर व्हिडीओ कॉल!

Next

गुगल असिस्टंटच्या मदतीने आता गुगलच्याच ड्युओ या अ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करणे आता शक्य झाले असून नवीन अपडेटमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे.

गुगल असिस्टंट या व्हाईस कमांड म्हणजे ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने कार्यान्वित होणार्‍या डिजीटल असिस्टंटला जगभरात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. गुगलने जगातील विविध भाषांचा सपोर्ट याला प्रदान केला आहे. आता तर कुणीही अगदी आपल्या भाषेतदेखील वापरू शकत आहे. याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी याला विविध अ‍ॅप्सशी कनेक्ट करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता गुगल असिस्टंटला ड्युअल अ‍ॅपचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. अर्थात आता असिस्टंटच्या कमांडने ड्युओ अ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल करता येणार आहे. यासाठी कोणत्याही युजरला फक्त ‘व्हिडीओ कॉल xxx’ असे म्हणावे लागणार आहे. यातील ‘xxx’च्या ठिकाणी ज्याला कॉल करायचा आहे त्याचे नाव घ्यावे लागेल. हे फिचर बोलून अथवा टाईप करूनदेखील वापरता येणार आहे. असे झाल्यानंतर संबंधीत युजर ड्युओ अ‍ॅपवरून थेट त्या व्यक्तीला व्हिडीओ कॉल करू शकणार आहे. जर समोरच्या व्यक्तीकडे ड्युओ अ‍ॅप इन्स्टॉल केलेले नसेल तर हा व्हिडीओ कॉल गुगलच्या हँगआऊट अ‍ॅपवर ‘रिडायरेक्ट’ होणार आहे.

हे अ‍ॅप गुगल असिस्टंटच्या अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालीच्या युजर्ससाठी अपडेटच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहे. याशिवाय, या अपडेटमध्ये मल्टी डिव्हाईस सपोर्टदेखील देण्यात आला आहे. यामुळे आता कुणीही विविध उपकरणांवर ड्युओ अ‍ॅप वापरू शकणार आहे.

Web Title: Now ask Google Assistant to make Duo Calls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.