Jio चा जबरदस्त रिचार्ज, दोन वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉल्स अन् फोनही मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 12:54 PM2022-07-02T12:54:43+5:302022-07-02T12:55:41+5:30

जिओनं आपल्या ग्राहकांना अनेक प्लान ऑफर केले आहेत. जिओला टक्कर देत इतर टेलिकॉम कंपन्यांनीही अनेक ऑफर्स आणल्या पण जिओनं आजवर दमदार ऑफर्स देत धक्कातंत्र आजमावलं आहे.

jio phone recharge plan rs 1999 offer 2 year validity | Jio चा जबरदस्त रिचार्ज, दोन वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉल्स अन् फोनही मिळणार!

Jio चा जबरदस्त रिचार्ज, दोन वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉल्स अन् फोनही मिळणार!

googlenewsNext

नवी दिल्ली-

जिओनं आपल्या ग्राहकांना अनेक प्लान ऑफर केले आहेत. जिओला टक्कर देत इतर टेलिकॉम कंपन्यांनीही अनेक ऑफर्स आणल्या पण जिओनं आजवर दमदार ऑफर्स देत धक्कातंत्र आजमावलं आहे. जिओचा एक प्लान तब्बल दोन वर्षांच्या वॅलिडिटीसह उपलब्ध आहे. इतर कोणत्याही टेलिकॉम कंपन्यांकडे असा प्लान नाही. 

दोन वर्षांची वॅलिडिटी तर मिळतेच पण हा रिचार्ज किफायतशीर देखील आहे आणि याचे फायदेही अनेक आहेत. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड प्लान्स आहेत. पण काही प्लान्स फक्त जिओ फोन युझर्ससाठी आहेत. जे ग्राहक जियोचा स्मार्टफोन वापरतात केवळ अशांनाच या प्लानचा लाभ मिळवता येणार आहे. 

Jio च्या प्लानमध्ये काय मिळणार?
जिओच्या दोन वर्षांच्या या प्लानमध्ये तुम्हाला जिओचा फोन देखील दिला जातो. म्हणजेच एका रिचार्जमध्ये दोन वर्षांची वॅलिडीटी आणि एक फोन असे दोन्ही लाभ मिळवता येतील. या प्लानची किंमत १९९९ रुपये इतकी आहे. म्हणजेच दोन हजारांमध्ये तुम्हाला दोन वर्षांच्या वॅलिडिटीचा रिचार्जसोबतच एक फोन देखील मिळतो. या रिचार्जमध्ये ग्राहकांना दोन वर्षांसाठी फ्री व्हाइस कॉलिंग, 48GB डेटा आणि जिओ अॅप्सचं सब्स्क्रिप्सन देखील मिळतं. हा प्लान नव्या यूझर्ससाठी आहे. जे लोक नवा जिओ फोन खरेदी करणार आहेत त्यांना याचा लाभ घेता येईल. 

Jio फोनमध्ये खास काय?
जिओ फोन हा एक फिचर फोन असूनही अत्यंत खास ठरतो. कारण यात 4G सेवा मिळते. फोनमध्ये 2.4-inch चा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा स्टोरेज तुम्हाला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येणार आहे. यात तुम्हाला WhatsApp, Facebook, YouTube सह अनेक अॅप्सही वापरता येतात. फोनमध्ये कॅमेरा देखील उपलब्ध आहे. यासह टॉर्च, एफएम रेडिओ आणि 3.5mm ऑडियो जॅकसह इतर खास फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  

Web Title: jio phone recharge plan rs 1999 offer 2 year validity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.