आयओएस ११ चे आगमन : जाणून घ्या टॉप १० फिचर्स !

By शेखर पाटील | Published: September 20, 2017 07:48 PM2017-09-20T19:48:38+5:302017-09-20T19:49:30+5:30

अ‍ॅपलने आपल्या आयओएस या मोबाईल ऑपरेटींग सिस्टीमची अकरावी आवृत्ती जगभरातील युजर्ससाठी उपलब्ध केली आहे.

ios 11 is now available to download: khow top 10 features | आयओएस ११ चे आगमन : जाणून घ्या टॉप १० फिचर्स !

आयओएस ११ चे आगमन : जाणून घ्या टॉप १० फिचर्स !

Next

अ‍ॅपल कंपनीने काही महिन्यांपूर्वी आपल्या वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये आयओएस ११ ही प्रणाली सादर केली होती. यानंतर या सिस्टीमचे अनेक प्रिव्ह्यू लाँच करण्यात आले होते. आता अखेर आयओएस ११ सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. आयफोन आणि आयपॅडधारक आपल्या सेटींगमध्ये जाऊन जनरल टॅबवर क्लिक करत या प्रणालीचे अपडेट मिळवू शकतो. आयओएस ११ प्रणालीत अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. यातील दहा निवडक फिचर्स खालीलप्रमाणे असतील.

१) सिरीच्या कार्यक्षमतेत वाढ- अ‍ॅपलचा व्हाईस कमांडवर कार्यान्वित होणारा डिजीटल असिस्टंट सिरी आयओएसच्या नवीन आवृत्तीत अधिक कार्यक्षम करण्यात आला आहे. आता सिरीच्या मदतीने नोटस् घेता येणार असून क्युआर कोड स्कॅन करण्याची सुविधाही यात असेल. 

२) नवीन अ‍ॅप स्टोअर:- आयओएच्या ११व्या आवृत्तीत अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरचा नवीन युजर इंटरफेस देण्यात आला आहे. यात फिचर्ड अ‍ॅप्स आणि गेम्ससाठी खास विभाग देण्यात आला आहे. नवीन अ‍ॅप स्टोअर हे प्रामुख्याने पाच विभागांमध्ये विभाजीत करण्यात आले आहेत.

३) दर्जेदार छायाचित्रे:- आयओएस ११ मध्ये कमी उजेडातही चांगल्या प्रतिची छायाचित्रे काढणे शक्य होणार आहे. लाईव्ह फोटोजला आता लूप आणि बाऊन्स इफेक्टदेखील प्रदान करण्यात आला आहे. तर फोटो अ‍ॅपमध्ये विविध छायाचित्रांच्या मदतीने मेमरी मुव्हीज या प्रकारचा व्हिडीओ तयार करण्याची सुविधाही यात असेल.

४) अद्ययावत मॅप्स: आयओए ११ या प्रणालीत अ‍ॅपलच्या मॅप्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यात प्रथमच इनडोअर नेव्हिगेशनची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. अर्थात याच्या मदतीने मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, सिनेमागृहे आदींच्या अंतर्भागाची माहिती मिळेल. 

५) एयरप्ले-२चा सपोर्ट- आयओएस ११ या आवृत्तीत होमकिटमध्ये स्पीकरसाठी नवीन कॅटेगिरी तयार करण्यात आली असून विविध खोल्यांमधील ध्वनीच्या नियंत्रणासाठी एयरप्ले-२चा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. 

६) नवीन म्युझिक अ‍ॅप- आयओएस ११मध्ये अ‍ॅपल म्युझिक अ‍ॅपसाठी युजर इंटरफेसही प्रदान करण्यात येणार आहे. यात कुणीही युजर आपले मित्र नेमके काय ऐकत आहेत? याची माहिती मिळवून त्यांना फॉलो करू शकणार आहे. तसेच नव्या प्रणालीत आयफोनसाठी नवीन कंट्रोल सेंटरची सुविधा देण्यात आली आहे.  

७) कार्यक्षम अ‍ॅपल पे :- आयओएस ११ या प्रणालीत अ‍ॅपल पे या पेमेंट सिस्टीमला अधिक कार्यक्षम करण्यात आले आहे. या पीआर-टू-पीअर पेमेंट प्रणालीस आता आय-मॅसेजशी संलग्न करण्यात आले आहे. यामुळे कुणीही युजर आयओएसच्या दुसर्‍या युजरसोबत आय-मॅसेजचा वापर करून रकमेची देवाण-घेवाण करू शकेल. 

८) आय-मॅसेजमध्ये नवीन फिचर्स:- आयओएसच्या ११व्या आवृत्तीत अ‍ॅपलच्या आय-मॅसेजमध्ये काही सरस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. याला सर्व उपकरणांना कनेक्ट करण्यात आले आहे. यामुळे एखाद्या उपकरणातील मॅसेज डिलीट केल्यानंतर अन्य सर्व उपकरणांमधील संदेश नष्ट होतील. तसेच यात इमोजी आणि स्टीकर्सच्या वापरासाठी खास टुलबार प्रदान करण्यात येणार आहे.

९) ऑग्युमेंटेड/अल्टेरनेट रिअ‍ॅलिटी :- अ‍ॅपलने आपल्या आयओएस ११ या आवृत्तीला ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी (विस्तारीत सत्यता) आणि अल्टरनेट रिअ‍ॅलिटीचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच अल्टरनेट रिअ‍ॅलिटीसाठी एआरकिट सादर केले असून याच्या मदतीने कुणीही विविध अ‍ॅप्स विकसित करू शकणार आहेत.

* आयपॅडसाठी खास फिचर्स:- आयओएस ११ या आवृत्तीत अ‍ॅपलच्या आयपॅडसाठी स्वतंत्र अ‍ॅप डॉक असेल. यावरील कोणतेही अ‍ॅप हे ड्रॅग अँड ड्रॉप या पध्दतीने वापरता येणार आहे. तसेच स्प्लीट व्ह्यूमध्ये दोन भिन्न अ‍ॅप उघडून फाईल्स/प्रतिमा/व्हिडीओ/टेक्स्ट/युआरएल आदींना ट्रान्सफर करण्याची सुविधाही

Web Title: ios 11 is now available to download: khow top 10 features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.