How to Check 5G Support in Mobile: तुमच्या मोबाईलमध्ये 5G मिळणार का नाही? असा मिळतो सिग्नल, एका सेटिंगमध्ये चेक करा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 12:23 PM2022-08-19T12:23:47+5:302022-08-19T12:24:09+5:30

5G Support Smartphone Setting: तुमच्या फोनवर 5G चालेल की नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. बहुतेक लोकांचे स्मार्टफोन हे 5G स्पेक्ट्रम लिलावापूर्वीचे आहेत. म्हणजेच, या स्मार्टफोन्सच्या निर्मितीच्या वेळी, भारतात 5G नेटवर्क कोणत्या बँडवर उपलब्ध असेल हे निश्चित नव्हते.

How to Check 5G Support in Mobile: If you get such a signal, check in one of the settings | How to Check 5G Support in Mobile: तुमच्या मोबाईलमध्ये 5G मिळणार का नाही? असा मिळतो सिग्नल, एका सेटिंगमध्ये चेक करा 

How to Check 5G Support in Mobile: तुमच्या मोबाईलमध्ये 5G मिळणार का नाही? असा मिळतो सिग्नल, एका सेटिंगमध्ये चेक करा 

googlenewsNext

5G स्पेक्ट्रम लिलावानंतर आता नेटवर्कच्या लाँचिंगची सर्वांना प्रतिक्षा आहे. आपल्या शहरात, देशात फाईव्ह जी येणार म्हणून अनेकांनी आधीपासूनच ५जी स्मार्टफोन घेऊन ठेवले आहेत. रिलायन्स जिो, एअरटेल, व्हीआयने तयारी जवळपास पूर्ण केली आहे. असे असताना तुमचा मोबाईल 5G चे नेटवर्क घेतो की नाही हे कसे तपासणार? 

तुमच्या फोनवर 5G चालेल की नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. बहुतेक लोकांचे स्मार्टफोन हे 5G स्पेक्ट्रम लिलावापूर्वीचे आहेत. म्हणजेच, या स्मार्टफोन्सच्या निर्मितीच्या वेळी, भारतात 5G नेटवर्क कोणत्या बँडवर उपलब्ध असेल हे निश्चित नव्हते. यामुळे चिनी कंपन्या ५जीच्या नावाने स्मार्टफोन आणत गेल्या लोक घेत गेले. आता बँडबाबत स्पेक्ट्रम लिलावानंतर समजले आहे. 

आपण असे तपासू शकता?
तुमच्या फोनवर 5G चालेल की नाही हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. तुम्हाला Connection किंवा Wi-Fi & Network या पर्यायावर क्लिक करावे लागेल. वापरकर्त्यांना येथे सिम आणि नेटवर्क किंवा काही फोनमध्ये मोबाइल नेटवर्कचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. 

येथे तुम्हाला नेटवर्क मोडचा पर्याय मिळेल. जर 5G Preferred Network Type दिसत असेल, तर तुमचा फोन 5G ला सपोर्ट करेल. तुम्ही 5G नेटवर्कला तुमचा मोबाईल सपोर्ट करतो की नाही हे आणखी एका मार्गाने शोधू शकता. यासाठी तुम्हाला स्मार्टफोन ब्रँडच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमच्या फोनचे मॉडेल शोधावे लागेल. वैशिष्ट्यांच्या सूचीमध्ये, तुम्हाला 5G बँडबद्दल माहिती मिळेल. जर तुमचा फोन 5G ला सपोर्ट करत असेल आणि ते बँड जर भारतात उपलब्ध असतील, तर तुम्हाला 5G सेवा मिळेल.

Web Title: How to Check 5G Support in Mobile: If you get such a signal, check in one of the settings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.