गुगलची आणखी एक सेवा 30 एप्रिलला बंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 04:09 PM2019-04-09T16:09:56+5:302019-04-09T16:24:09+5:30

Google Plus आणि Inbox by Gmail या सेवा बंद केल्यानंतर आता गुगलने आणखी एक सेवा लवकरच बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.

google play artist hub is also shutting down after google plus and inbox by gmail may because of youtube music | गुगलची आणखी एक सेवा 30 एप्रिलला बंद होणार

गुगलची आणखी एक सेवा 30 एप्रिलला बंद होणार

googlenewsNext
ठळक मुद्देGoogle Plus आणि Inbox by Gmail या सेवा बंद केल्यानंतर आता गुगलने आणखी एक सेवा लवकरच बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. Google Play Artist Hub हे 30 एप्रिलनंतर बंद करण्यात येणार आहे.गुगलने Google Play Artist Hub 2012 रोजी लाँच केलं होतं.

नवी दिल्ली - Google Plus आणि Inbox by Gmail या सेवा बंद केल्यानंतर आता गुगलने आणखी एक सेवा लवकरच बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. Google Play Artist Hub हे 30 एप्रिलनंतर बंद करण्यात येणार आहे. आवडत्या गीतकार, संगीतकाराची गाणी ऐकण्यासाठी या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करण्यात येत होता. 30 एप्रिलपर्यंत ही सेवा सर्व फोनमध्ये सुरू असेल मात्र 30 एप्रिलनंतर नवीन युजर्सना या अ‍ॅप्लिकेशनवर लॉगईन करता येणार नाही. 

गुगलने Google Play Artist Hub 2012 रोजी लाँच केलं होतं. यामध्ये कलाकार आपली गाणी अपलोड करू शकत होते. हे अ‍ॅप्लिकेशन सबस्क्राइब केल्यानंतर आपल्याला हवी ती गाणी आपण ऐकू शकत होतो. मात्र आता हे बंद होणार असल्याने युजर्स नाराज झाले आहेत. जे युजर्स ही सेवेचा वापर करत आहेत त्यांना 30 एप्रिलपर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर या अ‍ॅप्लिकेशनवर कोणत्याही प्रकारे गाणी, ऑडिओ, व्हिडिओ अपलोड करता येणार नाहीत. 

Google Play Artist Hub या अ‍ॅप्लिकेशनवर ज्या कलाकारांनी आपले व्हिडिओ, किंवा गाणी अपलोड केली आहेत त्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत फायनल रिपोर्ट आणि पैसे देण्यात येणार आहेत. त्यानंतर 1 जुलैपासून हे अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोरवरूनही हटविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. Youtube Music मुळे ही सेवा गुगल बंद करणार असल्याचा अंदाज आहे. Youtube Music सेवेवर गुगलला अधिक लक्ष केंद्रीत करायचं आहे. त्यामुळे आता युजर्सच्या स्मार्टफोनमधली Google Play Artist Hub ची जागा लवकरच Youtube Music घेणार आहे. याआधी गुगलने Google, Allo, Inbox by Gmail या सेवा बंद केल्या आहेत. 

गुगलने 2014 साली इनबॉक्स नावाने एक स्वतंत्र ई-मेल सेवा सुरू केली होती. युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन खूप साऱ्या नवीन सुविधेसह इनबॉक्स सुरू  करण्यात आले होते. एक परिपूर्ण ई-मेल सेवा कशी होईल या दृष्टीने गुगलने यामध्ये अनेक नवीन फीचर्स दिले होते. जरी इनबॉक्स हि ई-मेल सेवा गुगलने सुरू केली असली तरी सुद्धा जी-मेल ही  ई-मेल सेवा सुद्धा चालूच होती. मात्र गेल्या वर्षी म्हणजेच सप्टेंबर 2018 मध्ये गुगलने अचानक जाहीर केले की गुगलची इनबॉक्स ही  ई-मेल सेवा मार्च 2019 मध्ये बंद करण्यात येईल. 31 मार्च 2019 पर्यंतच इनबॉक्सची सेवा बंद होणार होती मात्र गुगलने आणखी दोन दिवसाची मुदतवाढ देत आता 2 एप्रिल 2019 रोजी इनबॉक्सची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तशी नोटीसच इनबॉक्स युझर्सला गुगलतर्फे पाठवण्यात आली होती. 

 

Web Title: google play artist hub is also shutting down after google plus and inbox by gmail may because of youtube music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.