Joker Malware: आताच डिलीट करा ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप अन्यथा होईल मोठं नुकसान; Google नं केलं आहे बॅन 

By सिद्धेश जाधव | Published: December 20, 2021 06:04 PM2021-12-20T18:04:20+5:302021-12-20T18:04:30+5:30

Joker Malware:

Google banned this dangerous app on play store delete it immediately 5 lakh downloaded  | Joker Malware: आताच डिलीट करा ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप अन्यथा होईल मोठं नुकसान; Google नं केलं आहे बॅन 

Joker Malware: आताच डिलीट करा ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप अन्यथा होईल मोठं नुकसान; Google नं केलं आहे बॅन 

Next

Joker Malware: अँड्रॉइड स्मार्टफोन आणि टॅबलेट युजर्ससाठी महत्वाची बातमी आली आहे. गुगल प्ले स्टोरवर जोकर मालवेयरने संक्रमित झालेला एक धोकादायक अ‍ॅप मिळाली आहे. विशेषम्हणजे हा अ‍ॅप Google Play Store वरून 5 लाखांपेक्षा जास्त वेळा डाउनलोड केला गेला आहे. हा अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटमध्ये असल्यास त्वरित अनइन्स्टॉल करावा नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.  

या धोकादायक अ‍ॅपचं नाव कलर मेसेज (Color Message) आहे. हा अ‍ॅप SMS टेक्स्टिंगला इमोजीच्या माध्यमातून जास्त मजेदार करण्याचं काम करतो. प्रथमदर्शनी सुरक्षित आणि मजेदार वाटणारा हा अ‍ॅप धोकादायक मालवेयरनं संक्रमित आहे. मोबाईल सिक्योरिटी सोल्युशन्स फर्म Pradeo नं कलर मेसेज अ‍ॅपमधील जोकर मालवेयरची माहिती दिली आहे.  

सिक्यॉरिटी फर्मनं या जोकर मालवेयरचा समावेश फ्लीसवियर (Fleecewear) कॅटेगरीमध्ये केला आहे. या मालवेयरमुळे अ‍ॅप युजर्सच्या परवानगीविना त्यांना प्रीमियम सर्विससाठी सबस्क्राईब करवतो. जोकर मालवेयरचा हा प्रकार जुना असतानाही हे अ‍ॅप 16 डिसेंबरपर्यंत Google Play Store वर उपलब्ध होतं. आता जरी प्ले स्टोरवर हे अ‍ॅप बॅन करण्यात आलं असलं तरी ज्या डिवाइसवर हे अ‍ॅप आहे त्यांच्यासाठी धोका अजूनही आहे. त्यामुळे तुमच्या डिवाइसमध्ये कलर मेसेज (Color Message) अ‍ॅप असेल तर ते त्वरित अनइन्स्टॉल करा.  

हे देखील वाचा: 

कोणताही गाजावाजा न करता Vivo लाँच केला शानदार स्मार्टफोन; 27 दिवस चालेल याची बॅटरी

सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास

Web Title: Google banned this dangerous app on play store delete it immediately 5 lakh downloaded 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.