असं ठेवा तुमचं फेसबुक अकाऊंट सुरक्षित 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 04:07 PM2018-09-29T16:07:58+5:302018-09-29T16:17:27+5:30

जगभरातील फेसबुकच्या 5 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे. युजर्सचा डेटा वारंवार चोरीला जात असल्याने फेसबुकच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.

facebook data breach tips to secure your facebook data | असं ठेवा तुमचं फेसबुक अकाऊंट सुरक्षित 

असं ठेवा तुमचं फेसबुक अकाऊंट सुरक्षित 

Next

नवी दिल्ली - जगभरातील फेसबुकच्या 5 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे. युजर्सचा डेटा वारंवार चोरीला जात असल्याने फेसबुकच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेसबुक नवं नवे फीचर्स आणत असतं. अशाच एका फीचर्सच्या माध्यमातून हॅकर्सनी हा डेटा हॅक केला आहे. तुमचं फेसबुक अकाऊंट सुरक्षित राहावं यासाठी कोणते उपाय करता येतील हे जाणून घेऊया. 

तुमच्या अकाऊंटचं ऑडिट करा

सर्वप्रथम तुम्ही तुमचं अकाऊंट कोठून अॅक्सेस केलंय ते तपासा. यासाठी फेसबुक अॅप किंवा साईट ओपन करा. तिथे Security and Login page वर जाऊन  Where You’re Logged in वर क्लिक करा. तुम्ही याआधी कोठून फेसबुक अॅक्सेस केलं आहे याचा तपशील क्लिक केल्यावर मिळेल. जर तुम्हाला यामध्ये एखादं संशयास्पद ठिकाण किंवा डिवाइसचं नाव दिसत असेल तर त्वरीत फेसबुक लॉग आऊट करा. 

वेळोवेळी पासवर्ड बदला

फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड वेळेवेळी बदलणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे तुमचं अकाऊंट हॅक होण्याची शक्यता कमी असते. तुम्हाला शक्य असल्यास दर महिन्याला पासवर्ड अपडेट करा. जेव्हा तुम्ही पासवर्ड बदलाल तेव्हा Keep me logged out from all devices वर क्लिक करा. असं केल्यास तुम्ही ज्या डिवाइस वर तुमचं अकाऊंट अॅक्सेस केलंय तेथून लॉगआऊट होईल. 

ड्यूल सिक्यूरिटी इनेबल करा

फेसबुक आपल्या युजर्सला ड्यूल सिक्यूरिटीचा पर्याय देते. या फिचर्सचा वापर करून युजर्स आपलं अकाऊंट सुरक्षित ठेऊ शकतात. अॅपच्या सेटींगमध्ये जाऊन सिक्यूरिटी अँड लॉग इन मध्ये जा. तिथे  Setting Up Extra Security मध्ये Use two factor authentication चा पर्याय मिळेल तो सुरू करा. हे चालू केल्यानंतर तुम्ही जेव्हा फेसबुक लॉग इन कराल तेव्हा रजिस्टर्ड नंबरवर एक कोड मिळेल. तो टाकल्यानंतरच तुम्ही लॉग इन करू शकता. 

मेसेंजरवर येणाऱ्या नको असलेल्या लिंकवर क्लिक करू नका. 

हॅकर्स अनेकदा तुमच्या मित्र-मैत्रिणींचं अकाऊंट हॅक करून त्यांच्यामार्फत तुम्हाला एखादी लिंक पाठवतो. मात्र तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केलं तर तुमची माहिती हॅकर्सकडे जाण्याची दाट शक्यता. त्यामुळे तुम्ही खात्री असलेल्या लिंकवरच क्लिक करा. तुमच्या मित्रामार्फत एखादी संशयास्पद लिंक आली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून त्याबाबत आधी खात्री करा. 

अॅप्सला दिलेली परवानगी चेक करा

फेसबुकवर तुमचा चेहरा कोणाशी मिळता जुळता आहे का? गेल्या जन्मी तुम्ही कोण होता? यासारखे अनेक गंमतीशीर प्रश्न विचारले जातात. मात्र ते धोकादायक आहेत. या लिंकवर क्लिककरून तुम्ही न कळत दुसऱ्यांना तुमच्या अकाऊंटचा अॅक्सेस देता. त्यामुळे अॅप किंवा साईटच्या सेटींगवर क्लिक करा. तिथे अॅप्स असा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. Apps and websites वर क्लिक केल्यास तुम्ही ज्या अॅप्सला परवानगी दिली आहे त्याची नावं समजतील. त्यानंतर डिसेबलवर क्लिक केल्यास इतर अॅप तुमचं अकाऊंट अॅक्सेस करू शकत नाही. 

Web Title: facebook data breach tips to secure your facebook data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.