'हा' आहे, जगातील सर्वात स्वस्त TV... जाणून घ्या खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 10:57 AM2018-11-28T10:57:58+5:302018-11-28T11:18:20+5:30

डीटेल या इलेक्ट्रॉनिक कंपनीने आता सर्वात स्वस्त दरात एलसीडी टीव्ही लॉन्च केला आहे. या नव्या टीव्हीची एमआरपी किंमत 4,999 आहे मात्र सध्या हा टीव्ही 3,999 रुपयांना उपलब्ध आहे.

detel launched 19 inch lcd tv at rupees 3999 | 'हा' आहे, जगातील सर्वात स्वस्त TV... जाणून घ्या खासियत!

'हा' आहे, जगातील सर्वात स्वस्त TV... जाणून घ्या खासियत!

Next
ठळक मुद्देडीटेल या इलेक्ट्रॉनिक कंपनीने आता सर्वात स्वस्त दरात एलसीडी टीव्ही लॉन्च केला आहे.नव्या टीव्हीची एमआरपी किंमत 4,999 आहे मात्र सध्या हा टीव्ही 3,999 रुपयांना उपलब्ध आहे.डी1 एलसीडी टीव्हीमध्ये 48.3 सेंटीमीटर (19 इंच) डिस्प्ले असून त्याचं रेजॉल्यूशन 1366 X 768 पिक्सल आहे.

नवी दिल्ली - डीटेल या इलेक्ट्रॉनिक कंपनीने आता सर्वात स्वस्त दरात एलसीडी टीव्ही लॉन्च केला आहे. या नव्या टीव्हीची एमआरपी किंमत 4,999 आहे मात्र सध्या हा टीव्ही 3,999 रुपयांना उपलब्ध आहे. डीटेलचा हा एलसीडी टीव्ही 19 इंचाचा पहिला D1 TV असणार आहे. डीटेलच्या मोबाईल अॅपवर तसेच B2BAdda.com वर डिस्ट्रीब्यूटर्सना खरेदी करण्यासाठी हा टीव्ही उपलब्ध आहे. 

देशातील हा सर्वात स्वस्त एलसीडी टीव्ही असल्याचा दावा कंपनीने केला आहे. डी1 एलसीडी टीव्हीमध्ये 48.3 सेंटीमीटर (19 इंच) डिस्प्ले असून त्याचं रेजॉल्यूशन 1366 X 768 पिक्सल आहे. तसेच या टीव्हीमध्ये A+ ग्रेड पॅनल असून इमेज क्वॉलिटी चांगली असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे. 

डीटेलच्या या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हीटीसाठी 1 एचडीएमआय आणि 1 यूएसबी पोर्ट देण्यात आले आहे. तसेच टीव्हीच्या दोन्ही कोपऱ्याला स्पीकर्स देण्यात आले असून यामुळेच डिस्प्ले लूक अधिक चांगला दिसत आहे. स्पीकर्समधून चांगली ऑडिओ सुविधा देण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे. डीटेल या कंपनीने आतापर्यंत 7 एलईडी आणि स्मार्ट टीव्ही लॉन्च केले आहेत. 

Web Title: detel launched 19 inch lcd tv at rupees 3999

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.