कमी किंमतीत 6GB रॅम आणि 4,800mAh बॅटरीसह Gionee K10 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: October 6, 2021 12:39 PM2021-10-06T12:39:40+5:302021-10-06T12:39:49+5:30

Latest Budget Phone Gionee K10: Gionee K10 स्मार्टफोन कंपनीने UNISOC प्रोसेसरसह सादर केला आहे. हा फोन 10 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.  

Budget phone Gionee k10 launched with unisoc tiger t310 6gb ram 4800mah battery in china   | कमी किंमतीत 6GB रॅम आणि 4,800mAh बॅटरीसह Gionee K10 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

कमी किंमतीत 6GB रॅम आणि 4,800mAh बॅटरीसह Gionee K10 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

googlenewsNext

जिओनीने आपला नवीन बजेट स्मार्टफोन आपल्या होम मार्केट चीनमध्ये सादर केला आहे. कंपनीने हा फोन Gionee K10 या नावाने बाजारात आणला आहे. या डिवाइसमध्ये कंपनीने UNISOC प्रोसेसरचा वापर केला आहे. तीन व्हेरिएंटसह येणारा हा फोन 6GB रॅम, 4800aAh बॅटरी आणि 10 वॉट  फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.  

Gionee K10 ची किंमत  

Gionee K10 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट चीनमध्ये उपलब्ध झाले आहेत. या फोनचा 3GB RAM आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट 619 युआन (जवळपास 7,164 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 689 युआन (जवळपास 7,976 रुपये) आहे. तसेच फोनच्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसाठी 819 युआन (जवळपास 9,480 रुपये) मोजावे लागतील.  

Gionee K10 चे स्पेसिफिकेशन्स 

जियोनी के10 फोनमध्ये 6.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या होल-पंच डिस्प्लेच्या रिजोल्यूशनची माहिती मात्र मिळाली नाही. प्रोसेसिंगसाठी यात UNISOC Tiger T310 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. हा डिवाइस 6 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. हा एक ड्युअल सिम 4G फोन आहे. सिक्योरिटीसाठी यात बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.  

Gionee K10 मधील कॅमेरा सेन्सर्सची सविस्तर माहिती समोर आली नाही. परंतु या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 5 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. कंपनीने यात 4,800 एमएएचची बॅटरी 10 वॉट फास्ट चार्जिंगसह दिली आहे.  

Web Title: Budget phone Gionee k10 launched with unisoc tiger t310 6gb ram 4800mah battery in china  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.