बापूंना अनोखी आदरांजली, महात्मा गांधींची ट्विटरवर इमोजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 06:37 IST2018-10-02T06:36:34+5:302018-10-02T06:37:23+5:30
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त टिष्ट्वटरने त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहण्याचे ठरविले आहे.

बापूंना अनोखी आदरांजली, महात्मा गांधींची ट्विटरवर इमोजी
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त टिष्ट्वटरने त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहण्याचे ठरविले आहे. गांधी जयंतीनिमित्त टिष्ट्वटरने गांधीजींची इमोजी तयार केली असून, ती २ आॅक्टोबरपासून एक आठवडाभर असेल. गांधी जयंती, महात्मागांधी, एमकेगांधी, बापूअॅट१५०, मायगांधीगिरी, नेक्ससआॅफगॉड, महात्माअॅट१५० या इंग्रजी तसेच गांधीजयंती या हिंदीत हॅशटॅगचा वापर करताच, गांधीजींची इमोजी दिसू लागेल. याआधी टिष्ट्वटरने दिवाळी, गणेश चतुर्थी, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अशाच प्रकारे इमोजी तयार केल्या होत्या.