यू ट्युबवर आता दिसणार ब्रेकिंग न्यूज, डेस्कटॉप आणि मोबाईलवरही झालं उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 03:06 PM2017-08-21T15:06:19+5:302017-08-21T15:08:05+5:30

सोशल मीडियावरचं प्रभावी माध्यम असलेल्या यू ट्युबवर आता तुम्हाला ब्रेकिंगसुद्धा पाहता येणार आहेत.

Available on breaking news, desktops and mobiles even now on Youtube | यू ट्युबवर आता दिसणार ब्रेकिंग न्यूज, डेस्कटॉप आणि मोबाईलवरही झालं उपलब्ध 

यू ट्युबवर आता दिसणार ब्रेकिंग न्यूज, डेस्कटॉप आणि मोबाईलवरही झालं उपलब्ध 

नवी दिल्ली, दि. 21 - सोशल मीडियावरचं प्रभावी माध्यम असलेलं यू ट्युबवर आता तुम्हाला ब्रेकिंगसुद्धा पाहता येणार आहेत. ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. यू ट्युबनं ब्रेकिंग न्यूजसाठी नवं टॅब दिलं असून, त्याद्वारे तुम्हाला ब्रेकिंग पाहता येणार आहेत. यू ट्युब होमपेज आणि मोबाइल अॅपमध्ये एक वेगळं सेक्शन जोडण्यात आलं आहे. ज्यात जगभरातून येणा-या ब्रेकिंग न्यूज एक व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. हे फीचर पहिल्यांदा Android Policeमध्ये उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

मोबाईलमध्ये ट्रेंडिंगमधल्या सेक्शनमध्ये तुम्हाला हे टॅब सापडणार आहे. या न्यूज टॅबमध्ये बार्सिलोनामधील दहशतवादी हल्ल्यांना व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, ब्रेकिंग न्यूजची ही सुविधा आयओएस आणि अँड्रॉइड डिव्हाइससाठी उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मोबाईल वापरकर्त्या युजर्ससाठी गुगल कंपनीने आपल्या अ‍ॅलो या मॅसेंजरची वेब आवृत्ती सादर केली होती. पहिल्या टप्प्यात अँड्रॉइड स्मार्टफोनवरून क्युआर कोड स्कॅन करूनच याचा वापर करता येतो आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गुगल अ‍ॅलो या मॅसेंजरची डेस्कटॉप आवृत्ती येणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. आता कुणीही आपल्या संगणकावरील क्रोम या वेब ब्राऊजरमध्ये अ‍ॅलो मॅसेंजर वापरू शकेल. अर्थात यात एक ट्विस्ट आहे. म्हणजेच अँड्रॉइडचे स्मार्टफोन युजर्स याचा वापर करू शकतील. अर्थात डेस्कटॉप आवृत्तीसाठी अँड्रॉइड स्मार्टफोन हा निकष बर्‍याच जणांच्या लक्षात येणार नाही. तथापि, गुगल अ‍ॅलो वापरण्यासाठी क्युआर कोड स्कॅन करावा लागणार असून, सध्या फक्त अँड्रॉइड स्मार्टफोनवरूनच ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर आयओएस प्रणालीसाठी ही सुविधा लवकरच मिळणार असल्याचे गुगल कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Available on breaking news, desktops and mobiles even now on Youtube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.