सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मान

By Appasaheb.patil | Published: April 21, 2023 06:44 PM2023-04-21T18:44:05+5:302023-04-21T19:35:10+5:30

अवैध दारू व्यवसायाच्या समूळ उच्चाटनासाठी सोलापूर जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात नाविन्यपूर्ण पध्दतीने ऑपरेशन परिवर्तन राबविले होते.

Solapur Rural Police Force felicitated by Prime Minister Narendra Modi | सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मान

सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मान

googlenewsNext

सोलापूर : अवैध दारू व्यवसायाच्या समूळ उच्चाटनासाठी सोलापूर जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात नाविन्यपूर्ण पध्दतीने ऑपरेशन परिवर्तन राबविले होते. याच ऑपरेशन परिवर्तनच्या उपक्रमाचे देशाच्या संसदेत कौतुक झालं होते. शुक्रवारी जागतिक नागरिक सेवादिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा सन्मान करण्यात आला.  

सोलापूर जिल्ह्यातील ऑपरेशन परिवर्तन उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सध्याचे पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सोलापूर जिल्ह्याच्या तत्काल‍ीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन परिवर्तन’ वर्ष २०२१-२२ मध्ये राबविण्यात आले होते. त्यांच्या या कामाची दखल घेत नागरी सेवा दिनी उपक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित केले गेले. अवैध व्यवसायात गुंतलेल्यांना त्यातून बाहेर काढून सर्व सामान्यांप्रमाणे जीवन जगता यावं यासाठी रोजगार निर्मितीवर भर दिला होता. याबाबत देशाच्या संसदेत प्रशंसा झाली होती.

जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायास आळा घालण्याकरिता, त्याचे समूळ उच्चाटनासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने नावीन्यपूर्ण पद्धतीचा उपक्रम राबविला होता. त्यांच्या या उपक्रमास पोल‍ीस यंत्रणेचे सहकार्य आणि स्थानिकांची साथ यामुळे त्यांचे आयुष्य पालटले. त्यांच्या या कार्याची दखल घेत  प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोलापूरचे सध्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे स्वीकारला आहे. यावेळी सहाय्यक पाेलिस निरीक्षक अतुल भोसले व सहाय्यक फौजदार निलकंठ जाधवर हेही उपस्थित होते.

Web Title: Solapur Rural Police Force felicitated by Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.