जीव धोक्यात घालून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचे वाचवले प्राण! औराद ते तेरामैल मार्गावरील थरार

By संताजी शिंदे | Published: April 22, 2024 06:46 PM2024-04-22T18:46:31+5:302024-04-22T18:46:41+5:30

चालका विरूद्ध मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Saved the lives of animals going to slaughter by risking their lives! Thrilling on the Aurad to Teramile route | जीव धोक्यात घालून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचे वाचवले प्राण! औराद ते तेरामैल मार्गावरील थरार

जीव धोक्यात घालून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचे वाचवले प्राण! औराद ते तेरामैल मार्गावरील थरार

सोलापूर : औराद ते तेरामैल दरम्यान कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना, जीप पलटी झाली. मात्र पोलिसांच्या मदतीने गुंजेगाव येथे वाहन आडविण्यात आले व त्यातील सात जनावरांची सुटका करण्यात आली. चालक पळुन गेला असून, त्याच्या विरूद्ध मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 एका वाहनातून जनावरे बेकायदा कत्तली करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. गोरक्षकांनी मंद्रुप जवळ सापळा रचला, दरम्यान एक वाहन (क्र.एमएच-१३ एएक्स-८७८०) येताना दिसून आली. वाहनाचा संशय आल्याने गोरक्षकांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. वाहन न थांबता वेगान निघाल्याने त्याचा पाठलाग केला. औराद ते तेरामैल दरम्यान गोरक्षकांच्या जीपला दाबल्याने ती उलटली. आतील गोरक्षक जखमी झाले, मात्र बाहेर येवून त्यांनी पोलिस व स्थानिक गोरक्षकांशी संपर्क साधला. पुढे गुंजेगाव येथे जनावरांच्या वाहनाला आडवण्यात आले. 

पोलिसांना पाहून चालक वाहन जागेवर साेडून पळून गेला. वाहनामध्ये एका म्हशीसह सात जनावरे होती. या प्रकरणी वाहन चालका विरूद्ध प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११(१)जे, भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत ४२७, ५०४, ५०६ मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत १७७, ८३ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंर्तत ९ प्रमाणे मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व जनावरांना अहिंसा गोशाळेत सोडण्यात आले आहे. हि कार्यवाही बजरंग दल जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, वीरेश मंचाल, रवी म्हेत्रे, अनिकेत गोरट्याल, विवेक वंगारी आदींनी पार पाडली.

Web Title: Saved the lives of animals going to slaughter by risking their lives! Thrilling on the Aurad to Teramile route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.