राजीनामा क्रमांक 4 ; सोलापुरातील आणखी एका लोकप्रिय आमदाराचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 04:45 PM2018-07-26T16:45:03+5:302018-07-26T17:04:36+5:30

राज्यभरात मराठा समाजाचे आमदार मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले. आता भारत भालके यांच्यारुपाने पाचवा राजीनामा सादर झालाआहे.

Resignation number 4; Pandharpur-Mangalwada MLA Bharat Bhalek resigns | राजीनामा क्रमांक 4 ; सोलापुरातील आणखी एका लोकप्रिय आमदाराचा राजीनामा

राजीनामा क्रमांक 4 ; सोलापुरातील आणखी एका लोकप्रिय आमदाराचा राजीनामा

googlenewsNext
ठळक मुद्देमला या पदावर राहण्यास नैतिकता वाटत नाही - भारत भालके महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये अस्थिरतेचे वातवरण

सोलापूर : राज्यभरात मराठा समाजाचे आमदार मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले असून राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याच्या निषेधार्थ पंढरपूर-मंगळवेढयाचे आमदार भारत भालके यांनी विधानसभा अध्यक्ष यांना पत्र देऊन आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा सादर केला आहे. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीची राजीनामा दिल्यानंतर या राजीनामा सत्राला सुरुवात झाली आहे. आता, अपक्ष आमदार भारत भालके यांनीही आपला राजीनामा दिला आहे. भारत भालके हे काँग्रेसच्या तिकीटावर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विजयी झाले होते. 

आमदार भारत भालके यांनी आपल्या राजीनाम्या पत्रात म्हटले आहे की, पुरोगामी शाहु-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये अस्थिरतेचे वातवरण झालेले आहे़ मराठा, धनगर, महादेव कोळी व मुस्लिम या समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळावे ही मागणी वारंवार ते करीत आहेत़यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व समाजाला लेखी व तोंडी आरक्षण देण्याचे आश्वासन देऊनही आज पावेतो आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतलेला नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे़ त्यामुळे या सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्यामुळे सध्या राज्यामध्ये आंदालनाचा वणवा पेटलला आहे़ अशा परिस्थितीमध्ये त्या सर्व समाजांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या पदावर राहण्यास नैतिकता वाटत नाही, म्हणून मी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या सदस्य पदाचा राजीनामा आपल्याकडे पाठवून देत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

राज्यातील अस्थिर वातावरण आणि मराठा, धनगर समाजाला केवळ आरक्षणाचे आश्वासन मिळाले. मात्र, प्रत्यक्षात हे आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे या सर्वच समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे भारत भालके यांनी म्हटले आहे. राज्यभरात मराठा समाजाचे आमदार मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले असून राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याच्या निषेधार्थ कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव व वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बुधवारी आमदारकीचे राजीनामे दिले. त्यानंतर, नाशिक मधील देवळा- चांदवड मतदार संघातील आमदार डॉ राहुल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी आज आमदारकीचा राजीनामा मराठा क्रांती समाजच्या समन्वयकांकडे सुपूर्द केला. आता, काँग्रेस आमदार भारत भालकेंनी राजीनामा देऊन मराठा आंदोलकांना बळ देण्याचे काम केले आहे. 

Web Title: Resignation number 4; Pandharpur-Mangalwada MLA Bharat Bhalek resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.