महिलेवर अत्याचार; काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंवर गुन्‍हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 09:53 PM2017-11-28T21:53:31+5:302017-11-28T21:53:59+5:30

व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करून दिलीप माने व धनंजय भोसले यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले.

Oppression of women; Former Congress MLA Dilip Manenwar guilty | महिलेवर अत्याचार; काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंवर गुन्‍हा

महिलेवर अत्याचार; काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंवर गुन्‍हा

Next

सोलापूर : तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी माजी आमदार तथा विधान परिषदेचे काँग्रेसचे विद्यमान उमेदवार दिलीप मानेंसह पाच जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करून दिलीप माने व धनंजय भोसले यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. त्यामुळे पीडित तरुणीने घाबरून दिलीप माने व धनंजय भोसले यांच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. अशी तक्रार पीडित तरुणीने न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दिलीप ब्रह्मदेव माने (वय 52, रा. महिला  हॉस्पिटलजवळ, सोलापूर),  निखिल नेताजी भोसले (30), त्याची पत्नी तृप्ती निखिल भोसले (30), आई वेदमती नेताजी भोसले (48, सर्व रा. महिला हॉस्पिटलजवळ, सोलापूर), धनंजय भोसले (45,  रा. डी-मार्टजवळ, जुळे सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण - 
यातील पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित तरुणीशी निखिल भोसले याने विवाहविषयक  वेबसाईटवरून मे 2016 मध्ये ओळख केली व मैत्री वाढविली. त्यानंतर निखिल भोसले याने त्या तरुणीशी तुळजापूर येथे लग्‍न केले. त्यानंतर निखिलने त्या तरुणीशी तुळजापूर व सोलापूर-पुणे महामार्गावरील एका ठिकाणी शरीरसंबंध ठेवले व त्या तरुणीचे नग्‍न फोटो काढले. निखिलची पहिली पत्नी तृप्ती व आई वेदमती यांनी निखिलने काढलेले फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करून दिलीप माने व धनंजय भोसले यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. त्यामुळे पीडित तरुणीने घाबरून दिलीप माने व धनंजय भोसले यांच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तृप्ती भोसले हिने त्या तरुणीचे  फोटो सोशल मीडियावर पाठवण्याची धमकी दिली व 2 कोटी रुपयांची मागणी केली.  निखिल व तृप्ती या दोघांनी पीडितेचे 6 तोळ्याचे मंगळसूत्र घेतले. तृप्तीने पीडित तरुणीचा व निखिलचा विवस्त्र फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले. त्यानंतर सर्वांनी मिळून पीडित तरुणीवर अ‍ॅसिड टाकून तिला ठार मारण्याची धमकी दिली म्हणून पीडितेने न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती.
 

Web Title: Oppression of women; Former Congress MLA Dilip Manenwar guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.