आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे केंद्र व राज्य शासनाकडून जवळपास ४३ कोटी ७१ लाख ४३ हजार ६३३ रुपये येणे असून, मागील तीन वर्षांपासूनची ही रक्कम असल्याचे सांगण्यात आले. 
 जिल्हा बँकेमार्फत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेखाली शेतकºयांना कर्ज वाटप केले जाते. बँकेकडून विकास सोसायटीमार्फत होणाºया डॉ. देशमुख व्याज सवलत योजनेतील कर्जाच्या व्याजाचा भार केंद्र व राज्य शासन उचलते. एक लाखापर्यंतचे कर्ज वर्षभराच्या मुदतीत भरले तर त्याच्या व्याजाची ७ टक्केप्रमाणे होणारी व्याजाची रक्कम शासन भरते. तीन लाखांपर्यंतच्या कर्जाचे दोन टक्के व्याज शेतकºयाने भरावयाचे असून, उर्वरित व्याजाची रक्कम केंद्र व राज्य शासन भरते. व्याजाची ही रक्कम प्रथम बँकेने भरावयाची असून, नंतर शासनाकडे मागणी करुन घ्यावयाची आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे केंद्र सरकारकडे २४ कोटी ३८ लाख ४७ हजार १२३ रुपये इतकी रक्कम येणे आहे. यामध्ये २०१४-१५ मधील दोन कोटी ९० लाख ६२ हजार ३२२ रुपये, १५-१६ मधील २० लाख ९४ हजार ४५ रुपये, १५-१६ वर्षांतील १८ कोटी ८८ लाख ३९ हजार ११८ रुपये असे २४ कोटी ३८ लाख ४७ हजार १२३ रुपये केंद्राकडून येणे आहे.
राज्य शासनाकडून १४-१५ या वर्षाची ४ कोटी ६६ लाख ५० हजार १५ रुपये, १५-१६ मधील ५ कोटी ६९ लाख ९८ हजार ४९५ रुपये, याच वर्षातील अतिरिक्त ७ कोटी ११ लाख ८८ हजार ५९५ रुपये तसेच १६-१७ मधील एक कोटी ८४ लाख ५९ हजार ४०५ रुपये असे १९ कोटी ३२ लाख ९६ हजार ५१० रुपये येणेबाकी आहे. केंद्र व राज्य शासनाकडे ही रक्कम मागणीसाठी मे २०१६ पासून पत्रव्यवहार केला असल्याचे बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले.