बलात्कार करून गर्भपात केल्याप्रकरणी तरुणास अटक

By Admin | Updated: May 11, 2014 00:08 IST2014-05-11T00:04:17+5:302014-05-11T00:08:15+5:30

सोलापूर : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व नंतर ती गरोदर राहिल्यावर गोळ्या देऊन गर्भपात केल्याप्रकरणी सुनील सोमनाथ राठोड (वय २१, रा. कुमठे, ता. उत्तर सोलापूर) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

The accused arrested for abortion | बलात्कार करून गर्भपात केल्याप्रकरणी तरुणास अटक

बलात्कार करून गर्भपात केल्याप्रकरणी तरुणास अटक

सोलापूर : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व नंतर ती गरोदर राहिल्यावर गोळ्या देऊन गर्भपात केल्याप्रकरणी सुनील सोमनाथ राठोड (वय २१, रा. कुमठे, ता. उत्तर सोलापूर) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
आरोपी सोमनाथ याने मजरेवाडी परिसरातील एका अल्पवयीन मुलीस गेल्या सहा महिन्यांपासून आमिष दाखवून सूत जमविले. त्याने तिला तुळजापूर रस्त्यावरील दर्शन लॉजवर नेऊन वेळोवेळी बलात्कार केला. यातून तिला दिवस गेले. ती तीन महिन्याची गरोदर असल्याचे समजताच त्याने तिला शनिवारी सकाळी गाठून दोन पांढर्‍या गोळ्या दिल्या. गोळ्या खाल्ल्यानंतर तिला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयाजवळच तिला रक्तस्त्राव होऊन गर्भपात झाला. ती रुग्णालयात दाखल झाल्यावर डॉक्टरांनी पोलिसांना कळविले. यावरून पोलिसांनी फिर्याद दाखल करून आरोपीस अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केल्यावर ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.

Web Title: The accused arrested for abortion