असेही फसले जाल! एटीएममध्ये अडकलेल्या कार्डचा वापर करून ७६ हजार लाटले

By विलास जळकोटकर | Published: February 17, 2024 07:13 PM2024-02-17T19:13:15+5:302024-02-17T19:13:55+5:30

आर्थिक फसवणूक : दोघा अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल

76,000 withdrawl using a card stuck in an ATM solapur crime fraud news | असेही फसले जाल! एटीएममध्ये अडकलेल्या कार्डचा वापर करून ७६ हजार लाटले

असेही फसले जाल! एटीएममध्ये अडकलेल्या कार्डचा वापर करून ७६ हजार लाटले

सोलापूर : एटीएम सेंटरमध्ये अडकलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर करून दोघा अनोळखी इस्मानी संबंधित खातेदाराच्या अकाउंट मधून तब्बल 76 हजार रुपयाहून अधिक रक्कम काढून फसवणूक केली. ही घटना महावीर चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये घडली याप्रकरणी कुमार रामचंद्र देवसानी (वय- ४९, रा. दत्तनगर, सोलापूर) यांनी शुुक्रवारी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी दत्तनगर दत्त मंदिर शेजारी राहणारे कुमार रामचंद्र देवसानी (वय- ४९) व त्यांचा भाऊ महेश देवसानी हे १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११:१५ च्या दरम्यान, एटीएम कार्ड घेऊन होटगी रस्त्यावरील महावीर चौकात असलेल्या आयसी. आयसी. आय एटीएम सेंटरमध्ये गेले होते. मशिनमध्ये कार्ड टाकून व्यवहार करीत असताना त्यांचं व त्यांचे भाऊ महेश दिवसांनी यांचे आयसीआयसीआय एटीएम कार्ड मशीन मध्येच अडकले. यासाठी संबंधितांनी बँकेकडे या संदर्भात माहिते देण्यास गेले. दरम्यान, दोघा अनोळखींनी याचा फायदा उठवत फिर्यादीचे बँकेतील खाते क्रमांक ०१९९०५०१००३५ खात्यावरुन १८ हजार ८०० व भावाच्या खाते क्रमांक ०१९९०५५००४०९ या खात्यामधून ५६ हजार ६०० रुपये असे एकूण ७६ हजार ४०० रुपये अनोळखी चोरट्यांनी आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुमार देवसानी यांनी शुक्रवारी सायंकाळी सदर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार शेख करीत आहेत.

Web Title: 76,000 withdrawl using a card stuck in an ATM solapur crime fraud news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.