जंगलात धावताना दिसले छोटे-छोटे डायनासोर; Video पाहून तुम्हीही चकीत व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 05:18 PM2022-12-11T17:18:23+5:302022-12-11T17:18:33+5:30

डायनासोरच्या व्हिडिओमध्ये अनेकांना गोंधळात टाकले आहे.

Viral Video: Small dinosaurs were seen running in the forest; watch the video | जंगलात धावताना दिसले छोटे-छोटे डायनासोर; Video पाहून तुम्हीही चकीत व्हाल...

जंगलात धावताना दिसले छोटे-छोटे डायनासोर; Video पाहून तुम्हीही चकीत व्हाल...

Next

लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनासोरचे वास्तव्य होते. डायनासोर आजच्या हत्तीपेक्षा कितीतरी पटीने मोठे होते. यातील काही डायनासोअरची फक्त शेवटीच 45 ​​फुटांपेक्षा जास्त लांब असायच्या. यावरुन त्यांच्या आकाराचा अंदाज लावता येऊ शकतो. पण, सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक महाकाय उल्का पडल्यामुळे डायनासोअरचा अंत झाला. पण, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून आजही डायनासोअर जिवंत आहेत का? असा प्रश्न निर्माण होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये डायनासोरसारखे दिसणारे काही विचित्र प्राणी जंगलात धावताना दिसत आहेत. हा आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ पाहून, हे डायनासोरचे पिले आहे का? असा प्रश्न तुमच्याही मनात उपस्थित होईल. खऱ्या डायनासोरच्या तुलनेत या प्राण्यांची उंची खूपच लहान दिसत असली तरी त्यांच्याप्रमाणेच लांब मान नक्कीच दिसते आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, शाकाहारी डायनासोरची मान अशी पातळ आणि उंच असायची. 

आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की, ते खरंच डायनासोर आहेत की इतर कुठलातरी प्राणी आहे? हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. 'हे डायनासोर कुठून आले?' असे कॅप्शन व्हिडिओसोबत लिहिले आहे. तर, जंगलात फिरणारे हे प्राणी डायनासोर नाहीत. यांची शेपटी डायनासोरच्या लांब मानेसारखी दिसते आहे. कोणीतरी व्हिडीओ एडिटिंगच्या मदतीने त्यांना डायनासोरसारखे दिसावेत म्हणून उलटे चालवले आहे.

Web Title: Viral Video: Small dinosaurs were seen running in the forest; watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.