इथे सुरू आहे कानशिलात लगावण्याची स्पर्धा, व्हिडीओ आणि फोटो झालेत व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 04:26 PM2019-03-25T16:26:32+5:302019-03-25T16:32:14+5:30

आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांबाबत ऐकलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा स्पर्धेबाबत सांगणार आहोत

Viral Video Of Slapping Championship or Competition In Russia | इथे सुरू आहे कानशिलात लगावण्याची स्पर्धा, व्हिडीओ आणि फोटो झालेत व्हायरल!

इथे सुरू आहे कानशिलात लगावण्याची स्पर्धा, व्हिडीओ आणि फोटो झालेत व्हायरल!

Next

(Image Credit : The Moscow Times)

आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांबाबत ऐकलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा स्पर्धेबाबत सांगणार आहोत, त्या स्पर्धेचे कितीतरी व्हिडीओ आधीच सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. खरंतर हे व्हिडीओ पाहून अशीही स्पर्धा असते का? किंवा असावी का? असे प्रश्न पडतात. 

(Image Credit : YouTube)

या व्हायरल व्हिडीओमध्ये बघितलं जाऊ शकतं की, निळ्या रंगाचं स्वेटर परिधान केलेला व्यक्ती समोर उभा असलेल्या व्यक्तीला जोरदार कानशिलात लगावतो आहे. त्यानंतर समोरची व्यक्ती खाली पडते. इतक्यात अम्पायर शिटी वाजवतो आणि निळा स्वेटर परिधान केलेली व्यक्ती जिंकली असं जाहीर होतं. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विजेत्याला २५ ते ३० हजार रूपये बक्षिस मिळतं.

म्हणजे जर तुम्ही गर्दीत काही लोकांना एकमेकांना फटकवताना बघाल तर गरजेचं नाही की, त्यांचं भांडणंच सुरू असेल. होऊ शकतं की, ते स्पर्धेत सहभागी असतील. रशियामध्ये होणारी ही फारच विचित्र अशी स्पर्धा आहे. 

रशियातील सायबेरियामध्ये स्लॅपिंग चॅम्पियन ऑफ २०१९ स्पर्धा होणार आहे. यात दोन पुरूष एकमेकांना कानशिलात लगावतात. ज्याने जास्त जोरात मारलं ती व्यक्ती यात विजयी ठरते. यात एका टेबलाच्या दोन्ही बाजूने दोन व्यक्ती उभे असतात आणि एकमेकांना गालावर चापटा मारतात. अशात जी व्यक्ती खाली पडेल ती हरली आणि जी उभी आहे ती विजयी असं असतं. 

Web Title: Viral Video Of Slapping Championship or Competition In Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.