नोकरी सोडून अन् किंमती वस्तू विकून प्राण्यांच्या मदतीसाठी आफ्रिकेत पोहोचला हा 'अवलिया'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 04:57 PM2019-03-11T16:57:18+5:302019-03-11T17:00:04+5:30

आतापर्यंत तुम्ही अनेकदा असं ऐकलं किंवा वाचलं असेल की, अमुक अमुक व्यक्तीने लक्झरी लाइफ, आराम, शानदार प्लॅट, चांगल्या पगाराची नोकरी हे सगळंकाही जगभर फिरण्यासाठी सोडलं.

Man moves to Africa for wildlife conservation | नोकरी सोडून अन् किंमती वस्तू विकून प्राण्यांच्या मदतीसाठी आफ्रिकेत पोहोचला हा 'अवलिया'

नोकरी सोडून अन् किंमती वस्तू विकून प्राण्यांच्या मदतीसाठी आफ्रिकेत पोहोचला हा 'अवलिया'

Next

आतापर्यंत तुम्ही अनेकदा असं ऐकलं किंवा वाचलं असेल की, अमुक अमुक व्यक्तीने लक्झरी लाइफ, आराम, शानदार प्लॅट, चांगल्या पगाराची नोकरी हे सगळंकाही जगभर फिरण्यासाठी सोडलं. आपल्याला वाटतं किती नशीबवान व्यक्ती आहे.  

नवनवीन जागांवर सुट्टी एन्जॉय करणे, नवीन अनुभ घेणे...हे कदाचित प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. अनेकांना सगळंकाही सोडून जगभरात नुसतं फिरावं. पण असाही एक व्यक्ती आहे ज्याने केवळ जगभर फिरण्यासाठी सगळंकाही सोडलं असं नाही तर दुसऱ्यांची काळजी देण्यासाठी हे सगळं सोडलं आहे.

स्वित्झर्लॅंडच्या २६ वर्षीय Dean Schneider याने हे सिद्ध केलं आहे की, तुम्हाला तुमच्या स्वप्नाप्रमाणे जगण्यासाठी परिस्थिती किंवा फार जास्त पैशांची गरज नसते. केवळ गोष्ट असावी ती म्हणजे साहस. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येत अडचणीचा सामना करण्याचं धाडस हवं. 

एका वर्षाआधी स्वित्झर्लॅंडमध्ये फायनॅन्शिअल प्लॅनर म्हणून हा तरूणी नोकरी करत होता. त्याने नोकरी सोडली. त्याच्याकडे जे काही होतं ते सगळं विकलं आणि तो साऊथ आफ्रिकेत निघून गेला.

इथे त्याने कैदेत जन्माला आलेल्या वाघांची काळजी घेण्यासाठी ‘Hakuna Mipaka’ क्लबची स्थापना केली. हा क्लब साधारण ३०० हेक्टर परिसराल पसरलेला आहे.  

इतर जंगली प्राणी जसे की, झेब्रा, कुडू, कोल्हे यांच्यासाठी इथे वेगळे क्षेत्र आहेत. जिथे ते स्वतंत्रपणे राहतात. 

‘Hakuna Mipaka’ असं या क्लबचं नाव आहे. हा स्वाहिली भाषेतील एक शब्द आहे. याचा अर्थ 'असीमित' असा होतो.

Dean Schneider ने त्याचं जीवन वन्यप्राण्यांचं रक्षण करणे आणि लोकांच्या मनात प्राण्यांप्रति प्रेम निर्माण करण्याला समर्पित केलं आहे. 
त्याचं म्हणणं आहे की, 'आपण वन्यप्राण्यांच्या स्वभावाचा आणि त्यांच्या व्यवहाराचा सन्मान केला पाहिजे. आपण केवळ त्याच गोष्टीची रक्षा करतो ज्यावर आपण प्रेम करतो'.

बालपणापासूनच त्याला जनावरांच्या दुनियेची फार आवड होती. त्यामुळे तो वन्यप्राण्यांवरील माहितीपट आणि वेगवेगळ्या प्राणी संरक्षण संघटना त्याच्या आयुष्याचा एक मुख्य भाग राहिल्या.

Dean Schneider ने जंगली जनावरांना समजून घेणे शिकले आणि नेहमी त्यांच्यासोबत एक विशेष नातं तयार करण्याचा प्रयत्न केला. 

Dean Schneider त्याच्या इन्स्टाग्रामवर वन्यप्राण्यांची अद्भूत सुंदरता दाखवून लोकांना शिक्षित करतो. 

आपण त्याला सोशल मीडिया स्टारही म्हणू शकतो. कारण इन्स्टाग्रामवर त्याचे ५६७ हजार फॉलोअर्स आहेत. जे दक्षिण आफ्रिकेतील त्याचं काम पसंत करतात. 

आपल्या मिशनबाबत Dean Schneider सांगतो की, 'वन्यप्राण्यांबाबत जास्तीत जास्त लोकांना शिक्षित करणे आणि प्राण्यांची सुंदरता लोकांना सांगणे हा माझ उद्देश आहे. मी लोकांच्या धारणा बदलण्यासाठी आणि प्राण्यांना वाचवण्यासाठी माहिती, पॅशन आणि व्हिज्युअल शक्तीमध्ये विश्वास ठेवतो'. 

Source: Bored Panda

Web Title: Man moves to Africa for wildlife conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.