खून करून मृतदेह कावळेसादच्या दरीत फेकला चार दिवसातील दुसरी घटना : आंबोलीची ओळख बदलतेय    

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 10:44 PM2017-11-11T22:44:43+5:302017-11-11T22:45:04+5:30

आंबोली कावळेसाद पॉर्इंटवरील खोल दरीत शनिवारी सकाळी अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

Second day's second incident of murder and dead body of Kavaladas: The identity of Ambalali changes | खून करून मृतदेह कावळेसादच्या दरीत फेकला चार दिवसातील दुसरी घटना : आंबोलीची ओळख बदलतेय    

खून करून मृतदेह कावळेसादच्या दरीत फेकला चार दिवसातील दुसरी घटना : आंबोलीची ओळख बदलतेय    

Next

सावंतवाडी - आंबोली कावळेसाद पॉर्इंटवरील खोल दरीत शनिवारी सकाळी अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. कावळेसाद पॉर्इंटवरच्या संरक्षक कठड्याला तसेच तेथील फुटटपाथवर रक्ताचा सडा पडला होता. तर मृतदेह बाहेर काढल्यावर त्या मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे छिनविछन्न अवस्थेत होता. तसेच चेहºयावर पिशवी गुंडाळली होती. त्यामुळे या युवकाचा खून करून मृतदेह दरीत टाकल्याचे पोलिसांनी सांगितले.

सांगली पोलिसांनी हत्या करून अनिकेत कोथळेचा मृतदेह चार दिवसांपूर्वी आंबोलीत आणून जाळला होता. ही घटना ताजी असतानाच आंबोली कावळेसाद पॉर्इंटवर आणखी एका खुनाचे प्रकरण उघडकीस आले आहे. आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंटवरील रेलिंगवर तसेच फुटपाथवर रक्ताचा सडा स्थानिकांना आढळून आला. त्यामुळे त्यांनी खोल दरीत बघितले असता कोणाचा तरी मृतदेह असल्याचे दिसत होते. याबाबतची माहिती तत्काळ आंबोली पोलिसांना देण्यात आली. आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पण त्यांना ओळखता येत नव्हते.

मृतदेह तब्बल सहाशे ते सातशे फूट खोल दरीत होता. त्यामुळे वरून दिसत नसल्याने अखेर दीड वाजण्याच्या सुमारास सांगेली येथील आपत्कालीन पथकाला बोलावण्यात आले. या पथकाने खोल दरीत उतरून मोठ्या शर्थीने मृतदेह सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाहेर काढला. यावेळी मृतदेहाच्या डोक्याला पूर्णपणे प्लास्टिक पिशवी गुंडाळली होती. तसेच चेहरा दगडाने ठेचला होता. त्यामुळे चेहरा ओळखताही येत नव्हता. साधारणत: चार ते पाच दिवसांपूर्वी हा मृतदेह टाकला असवा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. साधारणत: ३० ते ३५ वयोगटातील युवकाचा हा मृतदेह असावा, असा अंदाज असून मृतदेहाच्या अंगावर कपडे नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविला आहे.

आंबोलीतील कावळेसाद दरीत मृतदेह असल्याचे स्पष्ट होताच उपविभागीय पोलीस अधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्यासह पोलीस आंबोलीकडे रवाना झाले. त्यांनी मृतदेहाची पूर्ण माहिती घेतली. तसेच कावळेसाद पॉर्इंटवर मृतदेहाची ओळख पटविण्याबाबत काही मिळते काय हे बघितले. पण काही आढळून आले नाही. पोलिसांनी संरक्षक कठड्याला जे रक्त लागले आहे त्याबाबतही तपास करण्याचा निर्णय घेतला आहे.

कावळेसाद पॉर्इंटवरील खोल दरीत मृतदेह बाहेर काढण्यासाठी सांगेलीतील बाबल आल्मेडा, किरण नार्वेकर, राकेश अमरसकर, संतोष पालेकर, आबा नार्वेकर आदींनी मेहनत घेतली. तर आंबोलीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वास सावंत, प्रकाश कदम, गजानन देसाई यांनी सहकार्य केले.

Web Title: Second day's second incident of murder and dead body of Kavaladas: The identity of Ambalali changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा