सिंधुदुर्ग : मालवण शहरात स्वच्छता मोहीम, परिसर श्री सदस्यांनी केला स्वच्छ, साडेतीन टन कचरा गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 16:52 IST2018-05-14T16:52:57+5:302018-05-14T16:52:57+5:30
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने मालवणात रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मालवण तहसील कार्यालय, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग मालवण व मालवण पोलीस ठाणे हा परिसर श्री सदस्यांनी स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेतून एकूण साडेतीन टन कचरा गोळा करण्यात आला.

मालवण तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिमेत श्री सदस्य सहभागी झाले होते.
मालवण : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने मालवणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मालवण तहसील कार्यालय, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग मालवण व मालवण पोलीस ठाणे हा परिसर श्री सदस्यांनी स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेतून एकूण साडेतीन टन कचरा गोळा करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत मालवण शहरासह आंबेरी व चिंदर या बैठकीच्या ठिकाणचे शेकडो श्री सदस्य सहभागी झाले होते. तर मालवण नगरपरिषदेच्या नगरसेविका सुनीता जाधव व शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला.
धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी विशेष कौतुक केले. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांकडून एखादा सार्वजनिक परिसर निवडून नेहमीच अत्यंत चांगल्याप्रकारे स्वच्छता मोहीम राबवली जाते. सर्वच सदस्य प्रामाणिकपणे योगदान देतात, अशा शब्दांत कांदळगावकर यांनी कौतुक केले.