महामार्ग चौपदीकरणाच्या कासार्डे येथील हरियानाच्या कंपनी प्लॅन्टवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 18:09 IST2017-11-14T18:02:09+5:302017-11-14T18:09:22+5:30
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कासार्डे येथील के.सी.सी. बिल्डकॉन हरियाणा या कंपनीच्या प्लॅन्टवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून तोडफोड केली.सदर घटना सोमवारी रात्री 9 :00 वा.सुमारास घडली. याबाबत आज मात्र संबंधितानी असला प्रकार घडलेलाच नाही असे सांगत घुमजाव केले.

महामार्ग चौपदीकरणाच्या कासार्डे येथील हरियानाच्या कंपनी प्लॅन्टवर हल्ला
तळेरे (सिंधुदुर्ग): मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कासार्डे येथील के.सी.सी. बिल्डकॉन हरियाणा या कंपनीच्या प्लॅन्टवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून तोडफोड केली.सदर घटना सोमवारी रात्री 9 :00 वा.सुमारास घडली. याबाबत आज मात्र संबंधितानी असला प्रकार घडलेलाच नाही असे सांगत घुमजाव केले.
मुंबई गोवा महामार्गाच्या खारेपाटण संभाजीनगर ते कलमठ या टप्प्याचे काम के. सी. सी. बिल्डकॉन (हरियाना) या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीलाच संभाजीनगर ते कलमठ या टप्प्याध्ये येत असलेल्या कासार्डे येथे या कंपनीने रस्ता बनविण्यासाठी लागणारी सर्वच यंत्रणा सज्ज करून बसविण्याचे काम अंतिम टप्यात आले.
सध्या कासार्डे जांभुळगाव व ब्राम्हणवाडी येथील माळरानावर सध्या जेसीबीच्या सहाय्याने वाढलेल गवत व महामार्गासाठी हस्तांतरीत करण्यात आलेल्या जमिनीमध्ये सध्या काम सुरु करण्यात ओलेले आहे.
मात्र सोमवारी रात्री 9:00 च्या सुमारास काही दुचाकी वाहने घेऊन आलेल्या अज्ञांतानी दमदाटी करत येथील मॅनेजर कुठे आहे अशी विचारणा करत सुरक्षा रक्षक याच्याकडील चार्जीग लाईटच्या बॅटरी जबरदस्ती करून काढून घेतल्या व फोडून टाकल्या.
सुरक्षा रक्षकाच्या केबीनच्या काचा व खुच्र्याची तोडफोड केली. काही ठिकाणी लावण्यात आलेले लाईटचे बल्ब व हॅलोजनचीही तोडफोड करत केला. या अंधाराचा फायदा घेत तोडफोड केली. अशी माहिती येथील सुरक्षा रक्षकांनकडून देण्यात दिली.
येथील तोडफोड झाल्यावर अज्ञात व्यक्तींनी पळ काढला.मात्र अशाप्रकारे हल्ले सुरू झाल्यास येथील कर्मचा-याच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू होण्यापूर्वी अशी घटना घडल्याने येथील काही सामानाची किरकोळ तोडफोड झाली. मात्र सध्या येथे कोटय़वधी रुपयांची यंत्रणा व वाहने उभी असल्याने येथील कामगारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही तोडफोड कोणत्या कारणास्तव झाली हे समजू शकले नाही. तसेच याचि नोंद करण्यात आलेली नाही.
कार्यालय प्रमुखचे घुमजाव
ही घटन घडली त्यावेळी दिलेल्या माहितीत व मंगळवारी दिलेल्या माहितीमध्ये तफावत आढळत आहे. घटानेदीवाशी दिलेल्या घटनेपासून घुमजाव करत आपआपसात वाद कार्यालयाची तोडफोड झाल्याचे आले.