शारीरिक संबंधानंतर लगेच झोपण्याची पुरुषांना असते सवय, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 02:46 PM2018-12-21T14:46:28+5:302018-12-21T14:48:42+5:30

अनेकदा तुमच्या हे लक्षात आलं असेल किंवा कुणाकडून ऐकलं असेल की, शारीरिक संबंध ठेवल्यावर जोडीदार(पुरुष) लगेच झोपतो.

Men fall asleep after sex, Why do they do so know the reason | शारीरिक संबंधानंतर लगेच झोपण्याची पुरुषांना असते सवय, जाणून घ्या कारण!

शारीरिक संबंधानंतर लगेच झोपण्याची पुरुषांना असते सवय, जाणून घ्या कारण!

अनेकदा तुमच्या हे लक्षात आलं असेल किंवा कुणाकडून ऐकलं असेल की, शारीरिक संबंध ठेवल्यावर जोडीदार(पुरुष) लगेच झोपतो. त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्या महिला जोडीदार अर्थातच नाराज होत असतील. पण तरीही त्यांच्यात कोणता फरक बघायला मिळत नाही. खरंतर अनेक पुरुषांमध्ये ही सवय असते की, ते शारीरिक संबंध ठेवल्यावर आरामात झोपतात. पण असं का होतं? याचं कारण काय आहे? या प्रश्नांची उत्तरं खालीलप्रमाणे सांगता येतील.  

काही महिला जोडीदाराच्या या सवयीमुळे विचार करतात की, त्यांच्या जोडीदाराला कोणती शारीरिक समस्या तर नाही ना? पण याने सवयीने जास्त घाबरण्याची काहीच गरज नाहीये. कारण पुरुषांमध्ये असं होणं नैंसर्गिक मानलं गेलं आहे. पुरुषांमध्ये असं होण्याचं कारण शारीरिक संबंध ठेवताना होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासोबतच आणखीही काही कारणे आहेत, ज्यामुळे पुरुषांना शारीरिक संबंध ठेवल्यावर झोप येते.

काही प्रमुख वैज्ञानिक कारणे

१) अभ्यासकांनुसार प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे पुरुषांना लगेच झोप येऊ लागते. प्रोलॅक्टिन डोपामाइन एक असं तंत्र आहे ज्यात मेंदू जागी असतो. शारीरिक संबंधानंतर पुरुषांमध्ये हे हार्मोन्स कमी होतात, त्यामुळे त्यांना झोप येते.

२) तसेच आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे शारीरिक संबंध ठेवल्यावर पुरुषांमध्ये फील गुड हार्मोन अधिक प्रमाणात रिलीज होतात. यामुळेही त्यांना झोप येते. याने ज्या पुरुषांना अधिक थकवा जाणवतो, सुस्ती आणि तणाव जाणवतो, त्यांच्या शरीराला याने आराम मिळतो. त्यामुळे अर्थातच त्यांना झोप येणारच.

३) जर तुम्ही नियमीतपणे शारीरिक संबंध ठेवत असाल, तो तुमच्या शरीराची अंतर्गत प्रक्रिया तुम्हाला संकेत देते की, तुमची झोपायची वेळ झाली आहे. यासाठी मेलाटोनिन हार्मोन तुमच्या शरीराला झोपण्यासाठी तयार करतो.

४) जेव्हा प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन आणि मेलाटोनिन हे तिन्ही हार्मोन शरीरात रिलीज होतात, तेव्हा चांगली झोप लागते.

आणखीही काही कारणे

१) शारीरिक संबंध आणि झोप यात खोलवर संबंध असतो. शारीरिक संबंधानंतर मन आणि मेंदूला आराम मिळतो. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी शारीरिक संबंधाला एक चांगलं औषध मानलं जातं. 

२) शारीरिक संबंधानंतर पुरुषांना मानसिक संतुष्टी झाल्याचं जाणवतं. तसेच याने तणावही दूर होतो त्यामुळेही पुरुषांना चांगली झोप येते.

३) एकत्र वेगवेगळे विचार पुरुषांच्या डोक्यात असतात. अशात जेव्हा ते शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा त्यांना चांगली झोप लागते. कारण झोप ने येण्याला कारणीभूत ठरणारे विचार काही वेळेसाठी दूर केले जातात.

४) पुरुषांची इच्छाशक्ती चांगली असेल तर पुरुष त्यांना झोप येण्याची ही सामान्य समस्या नियंत्रणात ठेवू शकतात. हा कोणता आजार नाहीये. तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही जोडीदारासोबत आणखी चांगला वेळ घालवू शकता. याने तुमचं नातं आणखी चांगलं होईल.

Web Title: Men fall asleep after sex, Why do they do so know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.