जागतिक मतिमंद दिन : सातारकरांचे लक्ष वेधण्यासाठी मतिमंद मुले थिरकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 16:28 IST2017-12-08T16:20:38+5:302017-12-08T16:28:08+5:30
बजने दे थडक-थडक ढोल-ताशा धडक-धडक भंडारा छिडक-छिडक मल्हारी... या गाण्यावर तालबद्ध नृत्य करून मतिमंद मुलांनी सातारकरांचे लक्ष वेधले. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा नाका म्हणून ओळख असणारा पोवई नाका सकाळी यामुळे काही वेळासाठी थबकला. आशा भवनच्या विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

सातारकरांचे लक्ष वेधण्यासाठी पोवई नाक्यावर रॅली आल्यानंतर आशा भवनच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
सातारा : बजने दे थडक-थडक ढोल-ताशा धडक-धडक भंडारा छिडक-छिडक मल्हारी... या गाण्यावर तालबद्ध नृत्य करून मतिमंद मुलांनी सातारकरांचे लक्ष वेधले. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा नाका म्हणून ओळख असणारा पोवई नाका सकाळी यामुळे काही वेळासाठी थबकला. आशा भवनच्या विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
जागतिक अपंग सप्ताह सर्वत्र साजरा होत आहे. त्यापैकी दि. ८ डिसेंबरला जागतिक मतिमंद दिनाच्या निमित्ताने जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत शहर व परिसरातील मतिमंद शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
मतिमंद मुलांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली. यावेळी आनंद परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, आशा भवन, एहसास मतिमंद मुलांचे बालगृह आणि सक्षम या संस्था सहभागी झाल्या होत्या.
पोवई नाक्यावर रॅली आल्यानंतर आशा भवनच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. मतिमंद विद्यार्थ्यांचे नृत्य बघण्यासाठी पोवई नाका परिसरात वाहनांची चाके थबकली.
नृत्य करताना विद्यार्थ्यांमध्ये असणारा जोश आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून सर्वांनीच त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली. विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाल्यानंतर सातारकरांनी त्यांचे कौतुक केले.