सातारा :साताऱ्यातील तीनजण तडीपार, जबरी चोरी, खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:46 IST2017-12-23T16:43:00+5:302017-12-23T16:46:10+5:30

सातारा :साताऱ्यातील तीनजण तडीपार, जबरी चोरी, खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे
ठळक मुद्देकैलास नथु गायकवाड, सुनिल कल्याण खवले, अजय गोरख गायकवाड तडीपार तिघांवर शहर, शाहूपुरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे होता प्रस्ताव मंजुरी आदेश मिळताच वर्षासाठी तडीपार
सातारा : शहर व परिसरात चोरी, घरफोडी,जबरी चोरी, खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल असलेल्या तिघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
कैलास नथु गायकवाड, सुनिल कल्याण खवले, अजय गोरख गायकवाड (रा. नामदेवावाडी झोपडपट्टी, सातारा) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांवर शहर व शाहूपुरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
शाहूपुरी पोलिसांनी या तिघांना तडीपार करण्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला अधीक्षक पाटील यांनी शनिवारी मंजुरी दिली असून, आदेश मिळताच संबंधितांना जिल्ह्यातून बाहेर जावे लागणार आहे.