सातारा : बंगल्याचा कोयंडा तोडणाऱ्या चोरट्याचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 15:42 IST2018-05-22T15:42:33+5:302018-05-22T15:42:33+5:30

सातारा येथील भोसले मळ्यातील एका बंद बंगल्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Satara: The search for the thieves breaking the bungalow | सातारा : बंगल्याचा कोयंडा तोडणाऱ्या चोरट्याचा शोध सुरू

सातारा : बंगल्याचा कोयंडा तोडणाऱ्या चोरट्याचा शोध सुरू

ठळक मुद्देबंगल्याचा कोयंडा तोडणाऱ्या चोरट्याचा शोध सुरूचोरट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

सातारा : येथील भोसले मळ्यातील एका बंद बंगल्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रुपाली हणमंत सोनवणे यांनी या प्रकाराची तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार राधिका रस्त्याजवळ असणाऱ्या भोसले मळ्यात त्यांचा बंगला आहे. दि. १७ ते २१ मे च्या दरम्यान त्यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाला.

अज्ञात चोरट्याने बंद बंगल्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून हा चोरीचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा नोंद केला. पोलीस निरीक्षक किशोर निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Satara: The search for the thieves breaking the bungalow