सातारा : देवदर्शनाहून परतणाऱ्या ट्रॅक्सचा भीषण अपघात, महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 14:27 IST2018-05-29T14:26:46+5:302018-05-29T14:27:10+5:30
देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भरधाव ट्रॅक्सने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. चांदबाई बाळकू डोंगरे (वय ६०, रा. करोशी, ता. चिक्कोडी, बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

सातारा : देवदर्शनाहून परतणाऱ्या ट्रॅक्सचा भीषण अपघात, महिला जागीच ठार
सातारा : देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भरधाव ट्रॅक्सने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. चांदबाई बाळकू डोंगरे (वय ६०, रा. करोशी, ता. चिक्कोडी, बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, शिर्डी, शनी-शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणांहून देवदर्शन घेऊन बेळगावला परतणाऱ्या ट्रॅक्सने (केए २३ एम ९३२८) सातारा शहरानजीक बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात उभ्या असलेल्या (एमएच ०४ एफडी ४९६७) ट्रकला जोरात ठोकर मारली.
या अपघातात ट्रॅक्समध्ये बसलेल्या चांदबाई बाळकू डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुक्मिणी डोंगरे, नीता डोंगरे, सूरज डोंगरे, मंजुळा डोंगरे (सर्व रा. करोशी, चिक्कोडी) जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करीत आहेत.