पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भूकंपाचे सौम्य धक्के, भूकंपाची तिव्रता 4.5 रिश्टर स्केल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 11:11 PM2017-08-19T23:11:41+5:302017-08-20T05:42:09+5:30

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसह कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले.

Konkan earthquake's mild tremor with western Maharashtra, magnitude of earthquake, 4.5 rivet scale | पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भूकंपाचे सौम्य धक्के, भूकंपाची तिव्रता 4.5 रिश्टर स्केल

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भूकंपाचे सौम्य धक्के, भूकंपाची तिव्रता 4.5 रिश्टर स्केल

Next

मुंबई, दि. 19 - पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसह कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले.

या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 4.5 इतकी मोजण्यात आल्याचे सांगण्यात येते. तसेच, सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरातही भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.  शनिवारी रात्री 10.23 वाजताचा सुमारास या भूकंपाचे धक्के जाणवले. तर, हा भूकंपाचा केंद्रबिंदू  नेवाली या गावाजवळ असल्याचे सांगण्यात येत आहे. 

गेल्या महिन्यातही कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. दरम्यान,  या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. तसेच, भूकंप परिसरातील धरणे सुरक्षित असल्याचे  प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 


 

Web Title: Konkan earthquake's mild tremor with western Maharashtra, magnitude of earthquake, 4.5 rivet scale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.