कुशल मजुरांअभावी गुºहाळघरे बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:12 IST2018-03-18T23:12:51+5:302018-03-18T23:12:51+5:30

कुशल मजुरांअभावी गुºहाळघरे बंद!
मलटण : चवीनं गूळ खाणाऱ्यांना त्यामागचे कष्ट माहीत नसते. गुळात असणारे कॅल्शिअम हाडे मजबूत करतात. तसेच गूळ शेतकरी व गुºहाळ चालकालाही आर्थिकदृष्ट्या मजबूत करतो; पण ही स्थिती मागील चार-पाच वर्षांत पूर्णपणे बदलली आहे. गुºहाळघरे समस्यांच्या गर्तेत सापडली आहेत. फलटण तालुक्यातील वडजल, साखरवाडी, खराडेवाडी सुरवडी परिसरात असणारी गुºहाळे कुशल मजुराअभावी बंद असून, आता फक्त अवशेष बनून राहिली आहेत.
फलटण तालुक्यात तब्बल चार कारखाने जोमाने ऊस गाळप करत असताना गुºहाळघरांना मात्र चांगलीच घर-घर लागली आहे. दिवसेंदिवस अशा गुºहाळांची संख्या कमी होत आहे. याचे मुख्य कारण शोधले असता सर्वात मोठी आणि प्रामुख्याने कुशल व सक्षम मजुरांची असणारी वानवा लक्षात येते. एक छोटे गुºहाळ चालविण्यासाठी दोन गुळवे, चूल चालवण्यासाठी दोन-तीन चुलवे, चार ते पाच लोक रसापासून गूळ साच्यात भरण्यासाठी लागतात. आणखी चार-पाच लोक इतर कामासाठी लागतात. त्यामुळे अशा कुशल कामगारांची वानवा सतत जाणवू लागल्याने मजुरांअभावी गुºहाळे बंद आहेत.
गूळ व्यवसाय हा कारखान्याप्रमाणेच एकरी किती उतारा मिळतो? यावर अवलंबून असतो. कारखान्यात उतारा काढण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा असते. गुºहाळत मात्र नशीबच उतारा सांगत असते. कमी उतारा असणारा ऊस कारखाने नेत नाहीत. तो सगळा ऊस गुºहाळांना दिला जातो.
फलटण तालुक्यात सद्य:स्थितीत नव्वद टक्के गुºहाळे बंद आहेत. गुजरात, मुंबईच्या बाजारात गुळाला दर मिळत नाही, परिणामी तोटा होत असल्याचे चालक सांगतात.
पावकिलोचीही ढेप...
इतक्या सर्व समस्या असताना खराडेवाडी परिसरात नवीन तंत्रज्ञान वापरून गूळ तयार केला जात आहे. पूर्वी गूळ आठ ते दहा किलोच्या ढेपेत मिळायचा. आता मात्र तंत्रज्ञान पुढे जात असून, किलो-अर्धा किलो तसेच अगदी पाव किलोचीसुद्धा ढेप उपलब्ध आहे.
पेढा गूळाला मागणी
खराडेवाडीच्या गुºहाळ घरात नवीन पेढागूळ तयार होत आहे. त्यात वेलदोडे, मसाला टाकून पेढ्याच्या आकाराच्या ढेपा तयार करण्यात येत आहेत. याला परदेशात चांगली मागणी आहे.