महिला पोलिसांना धक्का देऊन पळणाऱ्याला चोप

By Admin | Updated: June 6, 2017 15:28 IST2017-06-06T15:28:35+5:302017-06-06T15:28:35+5:30

साताऱ्यात दुचाकीस्वार ताब्यात

Chasing the woman's police, chase the skier | महिला पोलिसांना धक्का देऊन पळणाऱ्याला चोप

महिला पोलिसांना धक्का देऊन पळणाऱ्याला चोप

आॅनलाईन लोकमत

सातारा , दि. 0६ : महिला पोलिसांना धक्का देऊन पळून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला बेदम चोप देण्यात आला. पोवई नाक्यावरून महिला पोलिसाला धक्का देऊन एक दुचाकीस्वार गुरूवार पेठेपर्यंत आला. त्याचा पाठलाग करून दोन महिला पोलिसांनी त्याला बागेजवळ पकडले. त्यानंतर महिला पोलिस आणि काही नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

पोवाई नाक्यावर मंगळवारी पावणेबाराच्या सुमारास दोन महिला पोलिस आपली ड्युटी बजावत होत्या. यावेळी एक दुचाकीस्वार युवक भरधाव वेगात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. मात्र त्याने महिला पोलिसांना धक्का देऊन दुचाकीसह पलायन केले. त्यानंतर संबंधित दोन महिला पोलिस त्याचा पाठलाग करत गुरूवार बागेपर्यंत आल्या.

या ठिकाणी एका दुचाकीस्वारला धडक बसल्याने संबंधित युवकाची गाडी थांबली. त्यानंतर महिला पोलिस आणि काही युवकांनी त्या युवकाची धुलाई केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Chasing the woman's police, chase the skier