केळवलीच्या माथ्यावर महाकाय दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:20 PM2018-08-27T23:20:16+5:302018-08-27T23:20:20+5:30

Big stone on the top of Kelavli | केळवलीच्या माथ्यावर महाकाय दगड

केळवलीच्या माथ्यावर महाकाय दगड

googlenewsNext

बामणोली : सातारा तालुक्याच्या परळी खोऱ्यात डोंगराच्या कुशीत मध्यभागी वसलेल्या केळवली गावालगतच्या डोंगराच्या माथ्यावर महाकाय दगडं धोकादायक स्थितीत आहेत. हे दगड कोसळण्याची स्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली रात्र काढत आहेत.
केळवली गावालगतच वरच्या बाजूला मोठा डोंगर असून, अनेक ठिकाणी मोठ-मोठे दगड आहेत. परिसरात पावसाळ्यात चार महिने पावसाची जोरदार अतिपर्जन्यवृष्टी होत असते. त्यामुळे काही ठिकाणी दगडी व झाडे कोसळण्याचे सत्र सुरू असते. पावसामुळे डोंगराच्या जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन महाकाय दगडंउघडे पडू लागले आहेत.
महाकाय दगडांचा थांबण्याचा आधारच संपू लागल्याने व ते गावच्या वरच्या बाजूला गावाच्या एकदम एका रेषेत डोंगरमाथ्यावर असल्याने ते जमीन खचल्यास किंवा भूसंख्यलन झाल्यास ते गाववर केव्हाही कोसळून जीवितहानी घडवतील, याचा नेम राहिला नसल्याने जनता जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत.
या परिसरात तीन महिन्यांपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने डोंगरराची धूप होऊन पाण्याच्या प्रवाहाबरोबर बरीचमोठे दगडं वाहून येत आहेत. रात्री-अपरात्री एखादा मोठा आवाज झाल्यास जनता घाबरून घराबाहेर धाव घेत आहेत. या दगडांमुळे गावकºयांची पूर्णत: झोप उडाली आहे. गावावर दगड कोसळण्याची स्थिती निर्माण झाल्याने माळीणसारखी परिस्थिती होते की काय? याचा धसकाच घेतला आहे.
हे महाकाय दगड हटविण्यासाठी ग्रामस्थांनी एक वर्षापूर्वी जिल्हाधिकाºयांसह सर्व प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते. संबंधित मंडलाधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शिळा धोकादायक असल्याचा अभिप्राय शासनाला पाठविला. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही शासनाला आपले पत्र देऊन दगडी हटविण्याच्या सूचना केल्या आहेत. ग्रामस्थही वारंवार पाठपुरावाही करत आहेत. मात्र अद्याप प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेतली नसल्याने स्थानिक जनता हतबल झाली आहे. दगड कोसळून मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार की काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीण येथे पावसामुळे डोंगर खचून अनेकजणांना मृत्युमुखी पडावे लागले होते. त्या घटनेची आठवण यानिमित्ताने होत आहे. अशी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची खरी आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर सध्या पाऊस सुरू असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.
मोठा आवाज आला तरी थरकाप
महाकाय दगडांचा आधारच संपला आहे. त्यामुळे हे मोठे दगडं वेळेतच न हटविल्यास ते केव्हातरी गावावर कोसळू शकतात. हे दगड हटवणे ग्रामस्थांनाही शक्य नसून त्याला प्रशासनाचीच गरज आहे. मात्र या दगडांनी आमची पुरती झोप उडवली. एखादा आवाज झाल्यास आम्हाला धडकी भरते,’ अशी माहिती ग्रामस्थ हरिभाऊ केरेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Big stone on the top of Kelavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.