संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून हवाई पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 04:58 PM2023-03-11T16:58:31+5:302023-03-11T16:59:24+5:30

पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण, संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदी बाबींवर काम

Aerial inspection of Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg by Union Minister Nitin Gadkari | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून हवाई पाहणी

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून हवाई पाहणी

googlenewsNext

नसीर शिकलगार

फलटण : महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज, शनिवारी हवाई पाहणी केली. यावेळी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर व अधिकारी देखील गडकरी यांच्यासोबत होते. पुणे, सासवड, जेजुरी, फलटण, माळशिरस अशी हवाई पाहणी करण्यात आली. तसेच नवीन पुणे-बेंगळुरु रस्त्याचीही यावेळी माहिती घेण्यात आली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५) हा २३४ किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) - सासवड - जेजुरी - निरा - लोणंद - फलटण - नातेपुते - माळशिरस - बोंडले - वाखरी - पंढरपूर असा आहे. या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण १२ पालखी स्थळे असून याठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. सध्या रस्त्याचे वेगाने काम सुरू आहे. सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि बाबींवर आधारित काम करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल. 

पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. 
 

Web Title: Aerial inspection of Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg by Union Minister Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.