corona virus updates ins satara-जिल्ह्यात २६ कोरोनाबाधितांचा मृत्यू, १४३४ नवीन बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 06:32 PM2021-04-26T18:32:40+5:302021-04-26T18:34:08+5:30

CoronaVirus Satara : सातारा जिल्ह्यात सोमवारी प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १४३४ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून २६ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आजअखेर एकूण ९५ हजार ५६ नागरिक कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत. सातारा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे तर खटाव तालुक्यातदेखील चिंता वाढविणारे चित्र आहे.

26 corona patients die in the district, 1434 new infected patients | corona virus updates ins satara-जिल्ह्यात २६ कोरोनाबाधितांचा मृत्यू, १४३४ नवीन बाधित रुग्ण

corona virus updates ins satara-जिल्ह्यात २६ कोरोनाबाधितांचा मृत्यू, १४३४ नवीन बाधित रुग्ण

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात २६ कोरोनाबाधितांचा मृत्यू, १४३४ नवीन बाधित रुग्णसातारा खटाव तालुके ठरलेत हॉटस्पॉट

सातारा : जिल्ह्यात सोमवारी प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १४३४ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून २६ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आजअखेर एकूण ९५ हजार ५६ नागरिक कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत. सातारा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे तर खटाव तालुक्यातदेखील चिंता वाढविणारे चित्र आहे.

जिल्ह्यातील अकराही तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. जावळी, कऱ्हाड, खंडाळा, कोरेगांव, माण, महाबळेश्वर, पाटण, सातारा, वाई या तालुक्यांमध्ये रविवारच्या तुलनेमध्ये सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली; परंतु खटाव आणि सातारा या दोन्ही तालुक्‍यांत चिंता वाढवणारे चित्र अजून कायम आहे.

सातारा तालुक्यात सोमवारी २९५ बाधित आढळले आहेत. रविवारच्या तुलनेत रुग्ण संख्या कमी झाली असली तरीदेखील जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण सातारा तालुक्यात आढळले आहेत. खटाव तालुक्यात रविवारी २६१ रुग्ण आढळले होते. सोमवारी यात आणखी वाढ झालेली आहे. तालुक्यात सोमवारी २७० रुग्ण आढळून आलेले आहेत. सातारा आणि खटाव हे दोन तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत.

जावळी, खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यातील कोरोनाबाधितांचे मृत्यू रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. इतर आठ तालुक्यांमध्ये मात्र कोरोनाबाधितांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. जिल्ह्यात आजअखेर २ हजार ३५५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

सोमवारी दिवसभरात नवे रुग्ण (कंसातील आकडे एकूण रुग्णांचे)

जावळी ७७ (४४०१), कऱ्हाड ७६ (१४७६२), खंडाळा ८७ (५८६१), खटाव २७० (८१०८), कोरेगांव ११८ (८००७), माण १४५ (५४६८), महाबळेश्वर ३८ (३१५८), पाटण ३२ (३८०२), फलटण २०४ (११९८३), सातारा २९५ (२१८००), वाई ८४ (७२३८ ) व इतर ११ (४६८)

Web Title: 26 corona patients die in the district, 1434 new infected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.