सांगलीवर दाट धुक्याची चादर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 07:46 AM2018-10-12T07:46:09+5:302018-10-12T10:11:35+5:30

सांगली शहर आणि परिसरात शुक्रवारी पहाटे दाट धुक्याची चादर पसरली होती. नवरात्रोत्सवातील शुक्रवार असल्याने दर्गामाता मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी होती.

Weather of Sangli : fog in Sangli | सांगलीवर दाट धुक्याची चादर

सांगलीवर दाट धुक्याची चादर

Next

सांगली : सांगली शहर आणि परिसरात शुक्रवारी पहाटे दाट धुक्याची चादर पसरली होती. नवरात्रोत्सवातील शुक्रवार असल्याने दर्गामाता मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी होती. धुक्यामुळे भाविकांसह वाहनधारकांना धुक्यातून वाट काढताना कसरत करावी लागली. गेली दोन दिवस पहाटे 5.30 ते सकाळी ८ वाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली जात आहे. निसर्गाची वेगवेगळी रुपे एकाच दिवसात दिसू लागली आहेत.  सांगली शहरात गुरुवारप्रमाणे शुकवारीही पहाटेपासून 8 वाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली होती. दाट धुक्यांमुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह, शाळकरी मुले, व्यावसायिक तसेच दुर्गामाता मदिराकडे जाणाऱ्या भाविकांना धुक्यांमधून वाट शोधत जावे लागले.

दाट धुके असल्यामुळे वाहनांना सावकाश जावे लागत होते. आठ वाजल्यानंतर सूर्यदर्शन झाले. गेली दोन दिवस अशीच परिस्थिती होती. सकाळ दाट धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांनी घेतला. गुरुवारी दुपारी शहरासह जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३२ अंशापर्यंत गेले होते. गेल्या आठवड्यात उकाडा आणि थंडी असे दोन्ही अनुभव एकाच दिवसात येत होते. आता धुके आणि कडक उन्हाचा खेळ सुरू झाला आहे. 

भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार आगामी चार दिवस तापमानात  चढ-उतार अनुभवास येतील. हवामानाचा हा लहरीपणा आता आणखी काही दिवस नागरिकांना सोसावा लागणार आहे. या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. खोकला, सर्दी, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

Web Title: Weather of Sangli : fog in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.