प्राध्यापकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे तिने सीएच्या परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 09:20 PM2018-01-21T21:20:08+5:302018-01-21T21:20:21+5:30

मिरजेतील रेवणी गल्ली या परिसरात आठ-बाय आठच्या एका लहानशा पत्र्याच्या खोलीत राहणा-या रेखा संजय मगदूम हिने चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत यश संपादन केले.

Through the guidance from the professor, she earned her BA in the examinations | प्राध्यापकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे तिने सीएच्या परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

प्राध्यापकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे तिने सीएच्या परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

Next

मिरज : मिरजेतील रेवणी गल्ली या परिसरात आठ-बाय आठच्या एका लहानशा पत्र्याच्या खोलीत राहणा-या रेखा संजय मगदूम हिने चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत यश संपादन केले. परिस्थितीशी संघर्ष करून रेखाने मिळविलेल्या यशाबाबत तिचे कौतुक होत आहे.
रेखा दीड वर्षाची असताना तिच्या वडिलांनी अचानक घर सोडले. तिची आई शकुंतला यांना तो मोठा धक्का होता.

मात्र न डगमगता आलेल्या खडतर परिस्थितीचा सामना करत त्यांनी रेखाचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन धुण्या-भांड्यांची कामे करीत रेखाला चांगल्या संस्कारांची शिदोरी देत वाढवले. सहावीपर्यंत शिक्षण झालेल्या शकुंतला यांनी अतिशय कमी उत्पन्न असतानाही लेकीच्या शिक्षणासाठी खर्च करण्यास मागेपुढे पाहिले नाही. रेखानेही परिस्थितीवर मात करत ज्युबिली कन्या शाळेत व डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिक्षण घेऊन पदवी शिक्षण पूर्ण केले.

रेखाचा महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च वाढत गेला; पण आईने तिच्या शिक्षणाला काही कमी पडू दिले नाही. रेखाची शिक्षणातील प्रगती पाहून मिरजेतील प्रा. संजय कुलकर्णी व प्रा. अभ्यंकर यांनी तिला चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केले. रेखाने चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेत यश संपादन केले. गेल्या २५ वर्षांपासून धुणी-भांडी करणा-या आईला चांगले दिवस दाखविण्याचे तिचे स्वप्न आहे. रेखाला सनदी लेखापरीक्षक म्हणून चांगली नोकरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत रेखाने यश मिळविल्याने सांगलीतील मालू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुचेता पाठारे यांनी रेखाला कपडे व आईला साडी भेट देऊन त्यांचे कौतुक केले. रेखाचे यश सर्वच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे पाठारे यांनी सांगितले.

प्रसंगी पोटाला चिमटा
रेखाची आई शकुंतला यांनी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन रेखा हिला लॅपटॉप व दुचाकी अशा तिला आवश्यक असलेल्या गोष्टी घेऊन दिल्या. मोठ्या जिद्दीने त्यांनी घराचा गाडा हाकला. चार्टर्ड अकाऊंटंट म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही. मात्र मोठी पुस्तके वाचून लेक मोठी परीक्षा पास झाल्याचे त्या सांगतात.

Web Title: Through the guidance from the professor, she earned her BA in the examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली