पाचशेची नोट दाखवून वाहतूक पोलिसांसोबत सेल्फी, दोघा तरूणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 02:41 PM2017-12-24T14:41:05+5:302017-12-24T14:41:20+5:30

दुचाकीवरून ‘ट्रिपल’ सीट जाताना अडविल्याच्या कारणावरुन वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी शिवाजी चौकात घडला. संबंधित दुचाकीस्वाराने पोलिसांसमोर पाचशे रुपयांची नोट धरून पोलिसांसह सेल्फी काढला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  

Self-arrest with the traffic police by showing a 500-page note, a crime against two young men | पाचशेची नोट दाखवून वाहतूक पोलिसांसोबत सेल्फी, दोघा तरूणांवर गुन्हा दाखल

पाचशेची नोट दाखवून वाहतूक पोलिसांसोबत सेल्फी, दोघा तरूणांवर गुन्हा दाखल

Next

 

सांगली : दुचाकीवरून ‘ट्रिपल’ सीट जाताना अडविल्याच्या कारणावरुन वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी शिवाजी चौकात घडला. संबंधित दुचाकीस्वाराने पोलिसांसमोर पाचशे रुपयांची नोट धरून पोलिसांसह सेल्फी काढला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  
संजय मारुती नायक (२५, रा. व्यंकटेश कॉलनी, नेवरी रोड, विटा) व सचिन रुपसिंग पवार (२६, रा. जुने सोलापूर, बीडी घरकुल, दक्षिण सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांना पाचशे रुपयांची लाच घेत असल्याचे दाखविल्यासाठी सेल्फी काढल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 
अमोल जाधव व श्रीकांत जाधव हे पोलिस शिवाजी चौकात उभा होते. खानापूरहून कºहाड निघालेल्या दुचाकीस्वारास (क्र. केए-२८-ईडब्ल्यू-३१९०) ट्रिपल सिट गेल्याप्रकरणी त्यांना अडविले. त्यांच्याकडे चालक परवाना मागितला असता, सचिन पवार याने जाधव यांचा हात पकडून मी कोल्हापूरचा आहे. तुला मी कोण आहे ते दाखवितो, असे म्हणून शिवीगाळ केली. पाचशेची नोट धरून लाच घेत असल्याचे दाखविण्यासाठी पोलिसांसोबत सेल्फी काढला. यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Self-arrest with the traffic police by showing a 500-page note, a crime against two young men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.